पाथरी (वार्ताहर)विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी शाळेतील भौतिक सुविधा,शैक्षणिक उपक्रम,तज्ञ शिक्षक या सोबतच पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष दिले पाहिजे असे भावनाताई नखाते यांनी प्रतिपादन केले. मंगळवार दि 09 सप्टेंबर 2025 रोजी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित शांताबाई नखाते प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी ता. पाथरी येथे शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या अध्यक्षीय स्थानावरून बोलत होत्या.शाळा,विद्यार्थी व पालक हा शैक्षणिक त्रिकोण आहे.शाळा विकासासाठी पालकांच्या सूचना ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात या हेतूने प्रस्तुत शाळेत शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे शिक्षक पालक मेळाव्यास मार्गदर्शन करताना संस्थेच्या सचिव सौ. भावनाताई नखाते,आदित्य नखाते, प्रशासकीय अधिकारी रोहिदास टेंगसे, मुख्याध्यापक नवनाथ यादव, प्राचार्य किशन डहाळे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमास संस्थेचे संचालक तथा वाल्मिकेश्वर ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी देवनांद्राचे कार्यकारी अधिकारी आदित्य नखाते,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रोहिदास टेंगसे , मुख्याध्यापक नवनाथ यादव,प्राचार्य किशन डहाळे, पालक प्रतिनिधी सुरेशराव जाधव,मंगलताई भालेराव, सय्यद रफिक, राधाताई दाढेल,सुरेश ढवळे, तुकाराम वाघ,अब्दुल खालेद बामुसा, अमोल तुपकर,शारदाताई पवार आदी उपस्थित होते.
संस्थेचे संचालक आदित्य नखाते यांनी पालकांशी प्रत्यक्ष चर्चा केली. उपस्थित पालकांपैकी अनेक जणांनी या चर्चेमध्ये सहभाग नोंदवला.सांगोपांग चर्चा झाल्यानंतर त्यावर लवकरच उपाययोजनाही करण्यात येतील असे आदित्य नखाते यांनी उपस्थितांना आश्वासन दिले.येथे आम्ही घडलो या उपक्रमांतर्गत शाळेची माजी विद्यार्थिनी कु. गायत्री सचिन कागबट्टे हिची पुणे येथे अभियांत्रिकी अभ्यासक्रमसाठी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पालकांसह तिचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नवनाथ यादव यांनी केले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांच्या अनुषंगाने काही सूचना मांडल्या. विचारांची आदान प्रदानता करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती विषयी पालकांनी समाधान व्यक्त केले.भविष्यात विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविण्याच्या दृष्टीने शाळेच्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची पालकांनी मनीषा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम चव्हाण व आसाराम सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन अरविंद गजमल व परमेश्वर खरात यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.