परभणी, दि. १० (जिमाका) – सेलू येथील शासकीय विश्रामगृहाच्या विस्तारीकरणास सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता दिली असून सुमारे रु.३२३ लक्ष इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास ही मान्यता देण्यात आली आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पाठपुरावा केला होता. प्रशासकीय मान्यतेबद्दल श्रीमती बोर्डीकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचा शासन निर्णय क्र.बीडीजी-२०२५/प्र.क्र. २९९/इमारती-३, दि. १० सप्टेंबर, २०२५ अन्वये शासकीय विश्रामगृहाचे विस्तारीकरणासप्र शासकीय मान्यता देण्यात आली आहे.अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांनी सेलू येथील शासकीय विश्रामगृहाचे विस्तारीकरण करण्यासाठी कामाचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेस्तव शासनास सादर केले होते.
प्रस्तावाच्या छाननीअंती अंदाजपत्रकातील कामाच्या समाविष्ट बाबी व त्याच्या किंमतीमध्ये सुधारणा केल्यानंतर प्रशासकीय मान्यता देण्यात आली.विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाच्या कामामध्ये तळमजला बांधकाम, विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा,वातानुकूलन, पंप आणि जनरेटर,परिसराचीप्रकाशयोजना,सीसीटीव्ही,पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पाण्याचा मुख्य साठा, फर्निचर,अंतर्गत / मार्ग रस्ते, जमीन विकास, पार्किंग, जमीन स्केपिंग आदी बाबींचा समावेश आहे.