शरद गोविंदराव पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी झाला , आज शरद नावाचा सह्याद्री ८५ वर्षांचा झाला आहे. पण,त्याची उंची, कणखरपणा आणि ताट असलेला स्वाभिमान कुठेच कमी झालेला नाही. सह्याद्री वयाने कमी किंवा असतो का? तो पर्वत चट्टान आहे तो त्याच डौलाने उभा आहे.वादळे आली गेली मात्र,तो उभाच आहे. पद्मविभूषण शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तसेच पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे.देशाला कृषी मंत्रालय आणि कृषी मंत्री आहे याची जाणीव शरद पवार कृषिमंत्री झाले तेव्हा कृषी मंत्रालयाची ओळख झाली यापेक्षा कल्पना आली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गट पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाचे नेतृत्व करतात. तसेच महाविकास आघाडी या प्रादेशिक राजकीय आघाडीचे अध्यक्ष आहेत.जेव्हा शरद पवारांनी जसा पुलोदचा प्रयोग केला तसा प्रयोग त्यांनी महाविकास आघाडी स्थापन करून केला.मात्र, यावेळी काँग्रेस सोबत होती तर पुलोदच्या प्रयोगावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाशी बंडखोरी केली होती. असो,ते केवळ राजकीय कारकीर्दीत स्थिरावले नाहीत तर राजकारणाच्या बाहेर, शरद पवार यांनी २००५ ते २००८ पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि २०१० ते २०१२ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले. ऑक्टोबर २०१३ ते जानेवारी २०१७ या कालावधीत ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते.२०१७ मध्ये, भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.या विविधांगी अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आज ८५ वा वाढदिवस. एवढ्या वयातही ते कधी थकत नाहीत ही अत्युच्च शक्ती येते कुठून?हा महाराष्ट्रातील प्रत्येकाला पडलेला सवाल.ज्याच उत्तर अनुत्तरीतच.
१० जून इ.स. १९९९ रोजी शरद पवारांनी काँग्रेस पक्षाशी दोन हात करून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. इ.स. १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला अथवा आघाडीस बहुमत मिळाले नव्हते. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली होती आणि विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले. इ.स. २००४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला. २२ मे इ.स. २००४ मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. २९ मे इ.स. २००९ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्यांची धुरा त्यांना देण्यात आली.कृषी मंत्री म्हणून त्यांनी स्वतः ची आणि कृषी मंत्रालयाची ओळख देशात कानाकोपऱ्यात निर्माण केली. जुलै इ.स. २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षकार्याला अधिक वेळ देण्याची इच्छा असल्याचे सांगून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांनी आपल्यावरील कार्यभार कमी करण्याची विनंती केली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.इ.स. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाला ५४ जागा मिळाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाआघाडीचे सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात शरद पवार यांचा मोलाचा सहभाग होता. शरद पवार हे नाव नाही तर ते एक महाराष्ट्राला आणि देशाला न उलगडलेले कोडे आहे. कारण, शरद पवार यांना सत्तेची ऊब जवळ हवी वाटते.हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील घडामोडींवरून लक्षात येते. पुलोदचा प्रयोग असेल किंवा महाराष्ट्रातील सरकार स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग असेल. या न उलगडलेल्या कोड्याला पुतणे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोड्यात टाकले , जुलै २०२३ मध्ये, अजित पवार यांनी शरद पवारांच्या विरोधात बंड केले आणि सत्ताधारी भाजप- शिवसेना सरकारमध्ये सामील झाले आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, राष्ट्रवादीच्या बहुसंख्य विद्यमान आमदारांनी पवार यांच्या समर्थनार्थ पक्ष सोडला. पण, शरदचंद्र नावाचा हिमालय डगमगला नाही .कारण, हिमालयाला धडका दिल्याने त्याचा टवका निघू शकतो.पण, हिमालय जमीनदोस्त झालेला ऐकिवात आहे काय?
अभेद्य राजकीय कारकीर्द आणि अफाट शक्ती उर्जा आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या कुणासाठी टणक तर कठीण कधी मृदू असलेल्या पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

– पदमाकर उखळीकर ,
(लेखक पीएम फाऊंडेशनचे अध्यक्ष असून,मुक्त पत्रकार आहेत.)
kalpadmakarukhlikar@gmail.com.
१९६७-६९ दरम्यान ते स्थानिक प्रशासनात (लातूर नगरपालिका) सहभागी होते. १९७२ ते १९८० पर्यंत, ते १९७२ ते १९७८ आणि १९७८ ते १९८० अशा दोन टर्मसाठी महाराष्ट्र विधानसभेच्या लातूर शहराचे आमदार होते. या काळात त्यांनी सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष, उपमंत्री (कायदा आणि न्यायव्यवस्था, सिंचन, प्रोटोकॉल), विधानसभेचे उपसभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषवली. १९८० मध्ये ते लातूर मतदारसंघातून ७ व्या लोकसभेवर निवडून आले .१९८० च्या दशकात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर सलग सातवेळा लोकसभा निवडणूक जिंकली.१९९९ पर्यंत त्यांनी १९८०, १९८४, १९८९, १९९१, १९९६, १९९८ आणि १९९९ अशा सलग सात लोकसभा निवडणुका जिंकल्या. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला . सलग सात वेळा लोकसभा निवडणूक जिंकणे ही वाटते तितकी साधी बाब नाही.
१९७८ मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावले आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात इ.स. १९७८ च्या बीड जिल्हापरिषदेची निवडणुकीत ते रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आले.१९८० मध्ये ते पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर १९९० आणि १९९५ मध्ये याच मतदारसंघातून ते निवडून आले.१९८० ते ८२ दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद, व त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद भूषविले. राज्यात युतीची सत्ता असताना त्यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. तर २००९ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले.




हमाल पंचायतीच्या माध्यमातून बाबा आढाव यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटित केले. जातीय भेदभावा विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी एक गाव एक पाणवठा या क्रांतिकारी चळवळीचे नेतृत्व केले आणि समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवला. महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीत जवळपास पाच दशकांहून अधिक काळ बाबा आढाव यांचा सहभाग राहिला. बाबा आढावांच्या नेतृत्वाचे सर्वात मोठे महत्त्वाचे वैशिष्टे म्हणजे त्यांना असणारे राजकीय व्यवहार्यतेचे भान. असंघटित कामगारांचे संघटन करताना शोषणाच्या कमी अधिक प्रमाणात लढत राहणे, असंघटितांसाठी लढताना शासनाशी आर्थिक मागण्या न करता स्वायत्तपणे सहकारी संस्थांमधून सामाजिक सुरक्षितता मिळवण्याचे प्रयत्न करणे आणि सामाजिक प्रबोधन घडवणे. संशोधन संस्थांचे सहाय्य घेऊनही संघर्षात्मक राजकारणाचे प्राधान्य कायम ठेवणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पक्षीय राजकारणात सहभागी न होता देखील कळीच्या मुद्यावर राजकीय भूमिका घेण्याचे धाडस दाखवणे अशा सर्व पातळ्यांवर बाबा आढावांमध्ये व्यवहार्यतेचे भान स्पष्ट होत जाते. संघर्ष आणि प्रबोधन अशा दुहेरी मार्गांनी झालेली त्यांच्या नेतृत्वाची वाटचाल पुरोगामी राजकारणाचा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. बाबा आढाव यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील अढळ तारा निखळला. त्यांच्या निधनाने असंघटित कामगारांचा आधारवड हरपला. बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

.या पथकामार्फत जिल्हाभरातील गोदावरी नदीपात्रामध्ये ठिकठिकाणी छापे मारून सदरील ठिकाणी अवैध वाळू उत्खननासाठी सापडलेली सामग्री त्याच ठिकाणी नष्ट करण्यात येत आहे.
याचाच एक भाग म्हणून काल दिनांक ८ डिसेंबर रोजी दुपारी पाथरीच्या उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण व तहसीलदार शंकर हंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार धोपे, मंडळ अधिकारी बागुल,तलाठी साजिद, तलाठी तायनाक, तलाठी गाडेकर, कोतवाल चव्हाण यांच्या पथकाने गौडगाव येथे कारवाई करण्यासाठी गुंज येथे जाऊन गोदावरी नदी पात्रातील एका बोटीच्या सहाय्याने गौडगाव गाठले परंतु त्या ठिकाणी चालू असलेले तराफे वाळूमाफियांकडून सकाळीच गायब करण्यात आल्याने सदरील ठिकाणी पथकाच्या हाती वाळू माफियांची जुनी सामग्री सापडली यावरच पथकाला समाधान मानावे लागले ती सामग्री लागलीच पथकाने नष्ट केली.



परभणी,दि.06(प्रतिनिधी) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवार 6 डिसेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध पक्ष, संघटना व संस्थांच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्ते व हजारो नागरीकांनी पुष्पहार अर्पण करुन व पुष्पवृष्टी करीत अभिवादन केले.
सभेचे अध्यक्ष डी. आय. खेडकर यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वज अर्ध्यावर फडकावण्यात आला. समता सैनिक दलाच्या डी. के. टोंपे, नागनाथ सोनुले आणि राहुल कोसे यांनी मानवंदना दिली. त्यानंतर भंते पी. धम्मानंद व भंते धम्मपाल यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशीलाचे ग्रहण करून दिले. बौद्धाचार्यांनी गाथा सादर करताच परिसर शांतता, करुणा आणि समतेच्या संदेशाने भारावून गेला.




