Home Blog Page 7

राष्ट्रीय महामार्ग ५४८ वर घोडके कन्स्ट्रक्शन कडून हजारो अनधिकृत झाडांची कत्तल

परभणी(प्रतिनिधी): पाथरी ते इंजेगाव राष्ट्रीय महामार्ग ५४८ वर आर.बी. घोडके इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीने रोड दुपदरीकरण आणि चौपदरीकरणाच्या नावाखाली हजारो अनधिकृत झाडांची कत्तल केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पर्यावरण ध्वंसकारी कृत्यामुळे स्थानिक पर्यावरणवाद्यांसह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र धर्मे यांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला असून, कंपनीवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

oplus_8388610

राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्रमांक चार, बीड येथील अधिकाऱ्यांनी आर.बी.घोडके इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडला पाथरी ते इंजेगावपर्यंत ४१ किलोमीटर लांबीच्या रोडचे दुपदरीकरण आणि चौपदरीकरणाचे टेंडर दिले होते. या कामाच्या कार्यक्षेत्रात मध्यभागापासून दोन्ही बाजूने आठ मीटरपर्यंत अडथळा ठरणारी केवळ २२९ झाडे (लिंब, पिंपळ, सिरस, बाभूळ, उंबर, सौंदड, वर्ड, बोर, पळस, गुलमोहर इत्यादी) तोडण्याची परवानगी वन विभागाने दिली होती. मात्र, कंपनीने या मर्यादेचे उल्लंघन करून रोडवरील सर्सकट हजारो झाडांची कत्तल केली असल्याचे पुरावे समोर आले आहेत. यामुळे राष्ट्रीय महामार्ग ५४८ वर पर्यावरणाचा मोठा ऱ्हास झाला आहे.

oplus_8388610

या प्रकरणाने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शासन दरवर्षी शतकोटी वृक्षलागवड मोहिमा राबवून कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, राष्ट्रीय महामार्गांच्या कामाच्या नावाखाली कंपन्यांकडून झाडांची अशा प्रकारे कत्तल होणे हे विरोधाभासी आहे. यातून वरकमाईसाठी नियमांचे उल्लंघन होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक रहिवाशांनी सांगितले, की या कत्तलीमुळे रोड किनारी सावली आणि ऑक्सिजन पुरवठा कमी झाला असून, प्रदूषण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

शिवसेनाचे परभणी जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. ११ डिसेंबर रोजी त्यांनी परभणी प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन देऊन आर.बी. घोडके इन्फ्रा कन्स्ट्रक्शनवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. २३ डिसेंबरला पुन्हा निवेदन देताना त्यांनी स्पष्ट इशारा दिला, की दोन दिवसांत कंपनीवर कारवाई झाली नाही तर २९ डिसेंबर रोजी वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे जाहीर केले. धर्मे म्हणाले, “पर्यावरणाचे रक्षण हे सर्वांचे कर्तव्य आहे. घोडके कन्स्ट्रक्शनने हजारो झाडांची अनधिकृत कत्तल करून निसर्गाचा लढवून टाकला आहे. वन विभागाने तातडीने कारवाई करावी.”

या प्रकरणाची चाहूल लागताच स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनीही हालचाली सुरू केल्या आहेत.पाथरी -इंजेगाव राष्ट्रीय महामार्ग हे बीड आणि परभणी जिल्ह्यांना जोडणारे महत्त्वाचे रस्ते आहे. येथील वृक्षकत्तलमुळे वाहनचालकांना उष्णतेचा त्रास होईल आणि जैवविविधता नष्ट होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. वन विभागाने अद्याप याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही, पण शिवसेनेच्या अल्टिमेटममुळे प्रकरण तीव्र स्वरूप धारण करत आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५४८वर घडलेल्या या घटनेने अनधिकृत वृक्षकत्तल आणि रोड कन्स्ट्रक्शन नियमांचे पालन याबाबत नवीन चर्चा सुरू झाली आहे. संबंधित विभागांनी तात्काळ तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनांना वेग येईल, असे मत व्यक्त केले जात आहे.

हिंगोलीचे पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्विकारला पदभार

 

 

हिंगोली(प्रतिनीधी)जिल्ह्याचे नूतन पोलिस अधिक्षक म्हणून नीलाभ रोहन यांनी बुधवारी(दि. २४)पदभार स्विकारला.पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या जागी डॉ. नीलाभ रोहन यांची पदस्थापनेने नियुक्ती झाली. मंगळवारी गृह विभागाने हे आदेश काढले. त्यानंतर बुधवारी डॉ. नीलाभ रोहन हे हिंगोली येथे दाखल झाले. त्यांनी पोलिस अधिक्षक पदाचा पदभार स्वीकारला. डॉ. नीलाभ यांच्याकडे यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी त्यांच्या पदस्थापनेचे आदेश निघाल्यानंतर बुधवारी त्यांनी पदभार स्वकारला. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेले डॉ. निलभ रोहन मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील राहणारे डॉ. निलाभ रोहन हे २०१६ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सहाय्यक पोलिस अधिक्षक म्हणुन जळगाव येथे सप्टेंबर २०२० मध्ये त्यांनी काम केले आहे. यापूर्वी ते परिविक्षाधीन पोलिस उपाधिक्षक पदावर इचलकरंजी येथे कार्यरत असताना प्रथम इचलकरंजीत अवैध व्यवसायाला त्यांनी चांगलाच चाप लावला असताना त्यांची एका महिन्यातच तडकाफडकी बदली झाल्यामुळे तेथे नागरीकासह विविध राजकीय पक्ष व संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. यानंतर त्यांनी जळगाव येथे कामगिरी बजावली असून जळगाव येथुन त्यांची नागपूर येथे विशेष कृती दलाचे अधिक्षक पदावर बदली झाली होती. वर्षभरातच त्यांना केंद्रीय प्रतिनियुक्तीवर केंद्रात बोलावले गेले होते तीन महिन्यांपूर्वी २४ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे दहशतवादी विरोधी पथकाच्या अधिक्षकपदी नियुक्ती झाली होती. नगरपालिका निवडणुकांची आचार संहीता संपताच २२ डिसेंबर सोमवार रोजी त्यांची हिंगोलीच्या पोलिस अधिक्षकपदी बदली करण्यात आली २३ डिसेंबर रोजी त्यांनी आपला पदभार स्विकारला.

उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाची कारवाई: अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले

पाथरी, (प्रतिनिधी): परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलली आहेत. या समस्येवर उपाय म्हणून अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली असून, त्याचाच एक भाग म्हणून मौ. रेणाखळी येथे रात्री सुमारे ३.३० वाजता टिप्पर पकडण्यात आला. ही कारवाई उपविभागीय अधिकारी श्रीमती संगीता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली.जिल्ह्यातील नद्यांच्या पात्रातून अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक ही सततची समस्या बनली आहे. विशेषतः पाथरी तालुका आणि आसपासच्या भागात रात्रीच्या काळात वाळू माफियांचा काळोखाने फायदा घेत सर्रासपणे ही बेकायदा व्यवसाय चालवतात. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून, नद्यांचे पात्र खणले जाणे, शेतीसाठी पाण्याची अडचण आणि स्थानिकांना त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल, पोलिस आणि इतर विभागांच्या संयुक्त पथकांना सूचना दिल्या होत्या. या पथकांना रात्रीच्या गस्तीचे विशेष निर्देश देण्यात आले होते, जेणेकरून वाळू माफियांना आळा बसेल.

रात्रीच्या गस्तीदरम्यान पथकाला पिवळ्या-पांढऱ्या रंगाचा संशयास्पद टिप्पर दिसून आला. हा टिप्पर मौ. रेणाखळी ता. पाथरी येथे अवैध वाळू वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ कारवाई करत श्री. वसंत पिटले (सहायक महसूल अधिकारी), श्री. एकनाथ गायकवाड (वाहनचालक) आणि श्री. राहुल कदम (महसूल सेवक) यांच्या टीमने टिप्परला अडवला. तपासणीत टिप्परमध्ये वैध परवानगीशिवाय भरपूर प्रमाणात वाळू आढळली. चालकाकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती, ज्यामुळे ही अवैध वाळू वाहतूक असल्याचे स्पष्ट झाले. टिप्पर ताब्यात घेऊन पुढील महसुली कारवाईसाठी तहसिल आवारात आणुन लावण्यात आले आहे.ही कारवाई केवळ एकट्याची नाही, तर परभणी आणि आसपासच्या जिल्ह्यांत सतत चालू असलेल्या मोहिमेचा भाग आहे. परभणीतील गुंज आणि इतर भागांतही ट्रॅक्टर आणि हायवा पकडले गेले आहेत.मात्र, पाथरी तालुक्यात वाळू माफियांचे धाडस वाढले असून, यापूर्वी शेतातील पाईप फोडणाऱ्या वाहनांवर गावकऱ्यांनी दगडफेक केली होती.अशा घटनांमुळे प्रशासनाला आणखी सतर्क राहण्याची गरज आहे. स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी या कारवाईचे स्वागत केले असून, ते म्हणतात की अशा सततच्या गस्तींमुळे अवैध वाळू उपसा थांबेल आणि नद्यांचे संरक्षण होईल. प्रशासनाने यापुढे दिवसभर गस्त वाढवाव्यात आणि माफियांवर कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाची ही धडक कारवाई खरेच उल्लेखनीय आहे

आम्ही दीलेले अश्वासने पूर्ण करतो; इतरांसारख्या भूलथापा मारत नाही – आ. राजेश विटेकरांनी माजी आमदार वरपुडकरांवर साधला निशाना

आम्ही दीलेले अश्वासने पूर्ण करतो; इतरांसारख्या भूलथापा मारत नाही – आ. राजेश विटेकरांनी माजी आमदार वरपुडकरांवर साधला निशाना

 

पाथरी(वार्ताहर): पाथरी मतदारसंघातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यात आमदार राजेश विटेकर यांनी माजी आमदार सुरेश वरपुडकर यांचे नाव न घेता जोरदार प्रत्यय केला. “आम्ही हाती घेतलेले काम नेहमीच पूर्ण करत आहोत. केवळ आश्वासने देणारे नाही, तर प्रत्यक्ष कामे उभी करणारे आहोत,” असे सांगून त्यांनी इतर नेत्यांच्या निवडणूक भूलथापांवर टीका केली.

oplus_8388610

२६ डिसेंबर शुक्रवार रोजी पोहेटाकळी येथे आयोजित सामाजिक सभागृह, शाळेत दोन वर्ग खोल्यांचे बांधकाम, शाळेची संरक्षण भिंत, हनुमान मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक, इत्यादी विकास कामांचा भव्य भूमिपूजन समारंभात पाथरी विधानसभाचे आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते अनेक महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती दादासाहेब टेंगशे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिल नखाते,माधवराव जोगदंड, संजय काका रणेर, पंचायत समितीचे माजी सभापती राजेश ढगे, बाळासाहेब कोल्हे,रमेश तांगडे, विष्णुपंत काळे,संतोष चव्हाण, अण्णासाहेब झुटे,विठ्ठलराव घांडगे,विष्णुपंत घांडगे,भरत घांडगे,संजय वाकणकर,अंकुश वाकणकर,विजय गलबे,महादेव ढवळे,सरपंच शामराव गोंगे, उपसरपंच गणेश बागल,बापूराव गोंगे,मुरली गोंगे,ज्ञानोबा गोंगे, भीमराव गोंगे,अशोक उजगरे,शिवाजी उजगरे पोलीस पाटील राहुल घुगे, तंटामुक्ती अध्यक्ष आबासाहेब गोंगे यांच्यासह स्थानिक नेते,पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा पाथरी मतदारसंघातील विकासकामांना गती देणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.

oplus_8388610

यावेळी बोलताना आ. विटेकर म्हणाले, “इतर नेते निवडणुकीच्या तोंडावर अनेक आश्वासने देतात. एखाद्या कामाचा शुभारंभ करायचा, मटेरियल आणून टाकायचा आणि निवडणुका झाल्या की उचलून घेऊन जायचा.चालू असलेली कामे अपूर्ण ठेवायची आणि पुन्हा निवडणुका आल्या की तीच कामे सुरू करायची. असे भूलथापा आम्ही मारत नाही. आम्ही हाती घेतलेली कामे दिलेल्या वेळेत पूर्ण करतो. दिलेला शब्द निभावतो.” या बोलीभाषेतून त्यांनी अप्रत्यक्षपणे माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या कारकीर्दीतील अपूर्ण प्रकल्पांवर बोट ठेवले.विटेकर हे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पाथरीतून निवडून आले असून,त्यांनी सुरेश वरपुडकर यांना १३,२४४ मतांच्या फरकाने पराभूत केले होते.

पाथरी मतदारसंघातील विकासकामांचा उल्लेख करताना आ. विटेकर म्हणाले, “आम्ही केवळ आश्वासने नाही तर कामे पूर्ण करणारे आहोत. पोहेटाकळी येथील हे भूमिपूजन त्याचाच ठोस पुरावा आहे. येथील रस्ते, पाणीपुरवठा,शाळा मूलभूत कामे लवकरच पूर्ण होणार आहेत.” या सोहळ्यात ग्रामस्थांनी त्यांच्या भाषणाला टाळ्या आणि जल्लोषाने दाद दिली. स्थानिक नेते दादासाहेब टेंगशे यांनीही विटेकरांच्या विकास धोरणाची प्रशंसा केली आणि येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

oplus_8388610

विटेकर पुढे म्हणाले, “येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आम्हाला आपले सहकार्य मिळावे.नाकी भूलथापा देणाऱ्यांना नाही.आम्ही पाथरी विधानसभामधील प्रत्येक गावापर्यंत विकास पोहोचवणार आहोत.” हे विधान राजकीय वातावरणात चर्चेचे केंद्र ठरले आहे. माजी आमदार वरपुडकर यांच्या कारकिर्दीतील अपूर्ण प्रकल्पांची आठवण करून देणाऱ्या या प्रत्ययाने स्थानिक राजकारणात नवीन चिंगारी पेटवली आहे.या भूमिपूजनाने परभणी जिल्ह्यातील ग्रामीण विकासाला चालना मिळेल, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.राजेश विटेकर यांच्या या आक्रमक भूमिकेने पाथरी मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.सविस्तर बातमी पुढील प्रमाणे पोहे टाकळी येथे.

 

 

 

पोहेटाकळी चे उपसरपंच गणेश बागल यांनी आमदार विटेकर यांच्याकडे केली विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी.

oplus_8388610

पोहे टाकळी येथे आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते विविध विकास कामाच्या भूमी पूजन प्रसंगी पोहे टाकळी येथे आले असता.पोहेटाकळीचे उपसरपंच गणेश बागल यांनी पोहेटाकळी येथील बारव मजबुतीकरण व सुशोभीकरणासाठी अंदाजीत ४५ लाख, हिंदू स्मशानभूमी सुशोभीकरण अंदाजित २० लाख रुपये व बौद्ध स्मशानभूमी साठी सुरक्षा भिंत तसेच सुशोभीकरणासाठी ३५ लाख असा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे पाथरी मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांच्याकडे केली आहे.

अस्मिता आणि आत्मसन्मान निर्माण करणारा विजय ! धुरंधर;सौ. अर्चना रोडे

अस्मिता आणि आत्मसन्मान निर्माण करणारा विजय !

धुरंधर;सौ. अर्चना रोडे

पदमाकर उखळीकर

परळी नगरपरिषद निवडणूक अटीतटीची झाली होती. यामध्ये अनेकांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्यात प्रामुख्याने काटे की टक्कर झाल्याचे प्रसंगी पहावयास मिळाले यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्या युतीने या महाविकास आघाडीस सुरूंग लावला म्हटले तर योग्य. तशी चर्चा निकालानंतर आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि महायुती यांच्यात थेट निवडणूक झाली असती तर त्याचे परिणाम वेगळे दिसले असते. जर तर चा भाग वेगळा मात्र या निवडणुकीत अपक्षांनी घेतलेली झेप नक्कीच दोन्ही प्रस्थापित पक्षांना मात देणारे ठरू शकते. कारण, एवढे अपक्ष उमेदवार निवडून येतील याची शाश्वती नसतानाही तब्बल सहा अपक्षांनी या निवडणुकीत बाजी मारली. यातील प्रभाग आठ मधील महेंद्र रोडे यांच्या सुविद्य पत्नी अर्चना रोडे यांनी विजय पटकावून भिमकन्या म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. कारण, प्रस्थापित पक्षाचे आणि साम दाम दंड भेद अशा प्रकारचे उमेदवार या निवडणुकीत उभे असताना एका भिमकन्याने अपक्षातून मिळविलेला विजय निश्चितच आंबेडकरी विचारांच्या नेत्यांना ,कार्यकर्त्यांना विचार करायला लावणारा आहे. यापूर्वी सुद्धा परळी नगरपरिषदेचे नगरसेवक व सभापती म्हणून काम केले आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्याचा सहभाग असतो.मतदार राजांनी दिलेली ही त्याची पोचपावती म्हणता येईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार केला आणि मोठ्या हिमतीने व चुरशीने लढून त्यांनी विजय संपादन केला आहे याबद्दल त्यांचे आंबेडकरी अनुयायांकडून विशेष कौतुक होत असून, शहरामध्ये अर्चना रोडे व महेंद्र रोडे यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने तिकीट नाकारल्यामुळे त्यांची अवस्था घायल असल्यासारखी झाले होते मात्र त्यांनी ही निवडणूक अपक्ष जिंकून घातक असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे ते या विजयाने धुरंधर म्हणून चर्चा होत आहे.परळी सारख्या शहरात एका आंबेडकरवादी विचारांचा नेता अपक्ष निवडून येण वाटतं तितकं नक्कीच सोपं नाही.याची प्रचिती महाराष्ट्राला माहीत आहे. परळीतील कोणतीही निवडणूक असो, त्याची चर्चा राज्यभर होते.अशा परळीत अपक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते महेंद्र रोडे यांच्या पत्नी अर्चना रोडे निवडून येण म्हणजे हा आंबेडकरी विचारांचा विजय आहे.कुठल्याही पक्षाचे आणि संघटनाचे पाठबळ नसताना हा विजय केवळ जनतेच्या बळावर खेचून आणला आहे भीम रणरागिणीने अर्चना रोडे यांनी.

कष्ट आणि सचोटी व केलेल्या कामाशी प्रामाणिक राहून त्यांनी सवंगड्यांना सोबत घेऊन, प्रस्थापित पक्षांना मात देत आंबेडकरवादी विचारांचा प्रभाव दाखवून दिला.आंबेडकरी विचारांचा विजय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेले न्यायपूर्ण, समताधिष्ठित आणि मानवी मूल्यांवर आधारित समाजाचे स्वप्न प्रत्यक्षात आणणे होय. हा विजय म्हणजे अस्मिता आणि आत्मसन्मान निर्माण करणारा आहे.या विजयाने त्यांची चर्चा शहरात धुरंधर म्हणून होत आहे.

भरदिवसा वाळूची अवैध वाहतूक करणारा टिप्पर पथकाने पकडला उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रमेश धोपे यांची दुचाकीवर जात कारवाई 

पाथरी (प्रतिनिधी): पाथरी तालुक्यात अवैध वाळू वाहतूक आणि वाळू माफिया यांचा धंदा नेहमीच चर्चेत असतो.परंतु मंगळवार रोजी भर दिवसा दुपारी साडेचारच्या सुमारास गुंज-तुरा रोडवर महसूल पथकाने लाल-पांढऱ्या रंगाचा नंबरविरहित टिप्पर पकडला.या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून, स्थानिक प्रशासनाने अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध ठोस पावले उचलल्याचे दिसून आले.पाथरी तालुका हा गोदावरी नदीच्या पात्रामुळे अवैध वाळूचा प्रमुख केंद्रबिंदू ठरला आहे. नाथरा, मरडसगाव, गुंज, गोडगाव, उमरा यासारख्या ठिकाणी दिवसभर वाळू माफियांकडून गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा केला जातो. ही वाळू रात्रीच्या अंधारात बिनबोभाटपणे वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक केली जाते. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, नदीकाठची पर्यावरणीय संतुलन बिघडत आहे.अशा प्रकारची वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभाग सतत प्रयत्नशील आहे, तरीही वाळू माफियांचे जाळे व्यापक असल्याने आव्हाने कायम आहेत.

सविस्तर बातमी अशी की, दुपारी ४ वाजून ३० दुपारच्या सुमारास नायब तहसीलदार रमेश धोपे यांना गुंज-तुरा रोडने अवैध वाळूत वाहतूक करणारा टिपर येत असल्याची माहिती मिळाली.या गुप्त माहितीच्या आधारे नायब तहसीलदार धोपे यांनी गुंज-तुरा रोडवरील सदर टिप्पर अडवला.तपासणीत नायब तहसीलदार धोपे यांना टिप्परमध्ये अवैध वाळू आढळली. चालकाकडे पावती किंवा परवानगीची कोणतीही कागदपत्रे नव्हती. चालकाने याबाबत स्पष्टीकरण देण्याऐवजी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.या घटनेची माहिती फोनवरून उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांना देण्यात आली.त्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि महसुली दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले. परिणामी, सदर टिप्पर पाथरी तहसील आवारात आणून जप्त करण्यात आला. चालकाविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू असून, टिप्पर मालक आणि संबंधितांवरही छापा टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही कारवाई भर दिवसा झाल्याने वाळू माफियांमध्ये भीती पसरली आहे.पाथरीसारख्या तालुक्यांत अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभाग भरारी पथके तैनात करतो. मात्र, अलीकडील घटनांमधून असे दिसते की, वाळू माफियांचा प्रभाव इतका प्रबळ आहे की, काहीवेळा अधिकाऱ्यांनाही धमक्या मिळतात. उदाहरणार्थ, परभणी जिल्ह्यातील इतर ठिकाणीही अशा कारवायांमध्ये पोलिस आणि महसूल पथकांना अडथळे आणले गेले आहेत. तरीही, या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनावरील विश्वास वाढला असून, गोदावरी नदी संरक्षणासाठी आणखी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.अवैध वाळू उपसामुळे नदीची खोली वाढत असल्याने पूरप्रवणता वाढते आणि शेतजमिनींना धोका निर्माण होतो. शासनाने गौण खनिज धोरणांत कडक अंमलबजावणी केली तरच वाळू माफियांचा उद्धव नष्ट होईल.पाथरी तालुक्यातील ही कारवाई भविष्यातील छाप्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.सदरील कारवाई उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रमेश धोपे, तलाठी विजय भदर्गे, सय्यद साजिद आणि श्रीनिवास तायनाक, सहाय्यक महसूल अधिकारी वसंत पिटले यांनी केली आहे.

———————हे ही वाचा —————–

रात्री चालु असलेल्या वाळुच्या अवैध वाळु वाहतुकीवर कधी होणार कारवाई

रात्रीच्या वेळी खुले-आम गोंडगाव,गुंज,मरडसगाव येथून वाळूची अवैध वाहतूक पाथरी-मानवत येथे वाहतूक रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत होत असताना पाथरी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून सदरील अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर का कारवाई केल्या जात नाही हे मात्र कळायला मार्ग नाही. सदरील वाहनांवर कधी कारवाई होणार हे देखील पाहणं औचित त्याचं राहील

काही क्षणातच माफीयांचा थवा तहसील आवारात दाखल

आज दुपारी पथकाने तुरा रोडवरील खदानजवळ अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पथकाने पकडला आणि तो टिप्पर पुढील कारवाईसाठी तहसीलमध्ये आणण्यात आला सदरील बाब अतिशय झपाट्याने वाऱ्यासारखी  वाळू माफियात पोहोचली आणि काही क्षणातच तहसीलच्या आवारामध्ये वाळू माफियांचा एक मोठा थवा दाखल झालं.

चार चाकीत बसलेल्या खबऱ्यांवर पोलिसांकडून कधी होणार कारवाई 

रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक गौडगाव,गुंज,मरडसगाव येथून रोज रात्री होते.परंतु सदरील अवैध वाढू वाहतुकीसाठी पाथरी शहराच्या आजूबाजूला वाळू माफी यांचे खबरी चार चाकी वाहनांमध्ये बसून महसूल प्रशासन असो की पोलीस प्रशासनावर नजर ठेवून असतात त्यामध्ये ज्या ठिकाणी महसूल अधिकारी किंवा तहसीलच्या अधिकारी,वरीष्ठ पोलीस अधिकारी वास्तव्यास असलेल्या ठिकाणाच्या अवघ्या काही अंतरावरच चार चाकी वाहनात खबरी तैनात असतात. त्याच बरोबर पोखर्णी फाटा, आयटीआय कॉर्नर, तुरा फाटा, सोनपेठ फाटा, बाबळगाव फाटा इत्यादी ठिकठिकाणी वाळू माफियांचे खबरी हे चार चाकी वाहनांमध्ये बसून रस्त्यावर पाळत ठेवत असतात सदरील खबऱ्यांवर पोलिसांकडून कधी होणार कारवाई याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

 

 

महापालिका निवडणूक : उद्यापासून प्रभाग समिती �ब� कार्यालयातून नामनिर्देशन पत्र वितरण करण्यात येणार

महापालिका निवडणूक : आज प्रभाग समिती �ब� कार्यालयातून नामनिर्देशन पत्र वितरण करण्यात येणार

 

परभणी,दि.22(प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आज मंगळवार 23 डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्रांचे वितरण प्रभाग समिती �ब� कार्यालयातून संपूर्ण शहरासाठी एकाच ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

महानगरपालिका निवडणुकीसाठी 23 ते 30 डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी करण्यात येणार असून, पात्र व अपात्र उमेदवारांची यादी त्याच दिवशी जाहीर केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 2 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत असणार आहे. त्यानंतर 3 जानेवारी रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून, अंतिमरीत्या निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादीही त्याच दिवशी प्रसिद्ध केली जाणार आहे.

निवडणुकीसाठी मतदान 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडणार आहे. तर मतमोजणी 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्या मंगळवार 23 डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्रांचे वितरण प्रभाग समिती �ब� कार्यालयातून संपूर्ण शहरासाठी एकाच ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

पाथरीत कोण मारणार बाजी बाबाजानी दुर्राणी,राजेश विटेकर की सईद खान? अवघ्या काही वेळातच मतपेटीचे पिटारे खुलणार काउन्टडाऊन सुरु

पाथरीत कोण मारणार बाजी

बाबाजानी दुर्राणी,राजेश विटेकर की सईद खान?

अवघ्या काही वेळातच मतपेटीचे पिटारे खुलणार काउन्टडाऊन सुरु

पाथरी (प्रतिनिधी)राजकीय दृष्ट्या परभणी जिल्ह्यामध्ये सर्वांचं लक्ष असलेली पाथरी नगरपालिका अध्यक्षासह नगरसेवकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. तब्बल १९ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अवघ्या काही वेळातच निवडणुकीचा निकाल मतमोजणीतून होणार आहे.या निकालाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.कारण या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी,राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेश विटेकर,अल्पसंख्यांक विभागाचे शिवसेना प्रदेशाध्यक्ष सईद खान यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून अवघ्या काही वेळातच पाथरी नगरपालिकेवर कोणाचं अधिराज्य असणार आहे हे स्पष्ट होणार आहे.
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असलेल्या पाथरी नगरपालिका निवडणुकी अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची मानली जात आहे. या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी,राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेश विटेकर,अल्पसंख्यांक शिवसेना प्रदेशाध्यक्ष सईद खान अशी सरळ लढत पाथरी मध्ये पहावयास मिळाली होती.

पाथरी पोलिसांचा कडेचोट बंदोबस्त; संवेदनशील भागात पोलिसांची नजर -पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे

आता १९ दिवसाच्या प्रतिक्षेनंतर अवघ्या काही वेळातच म्हणजे १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीची पूर्ण तयारी प्रशासनाकडून आली असून पाथरी नगरपालिकेवर कोणाचे वर्चस्व असणार हे अवघ्या तासांमध्येच समोर येणार आहे. आत्ता काही तासाभराचा काउन्टडाऊन सुरू झाला आहे.

काँग्रेस पक्षाने काय नाही केले! 

 

महाराष्ट्रातील काही मोजक्या किंवा बोटावर मोजता येतील इतक्या नेत्यांचे थेट सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधता येईल असे विश्वासाचे नाते होते. जे की, थेट सोनिया गांधी यांना बोलू शकतील त्यांना कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही. त्यातील अनेक जणांनी काँग्रेसचा हात सोडला आणि हाताता कमळ घेतले. मात्र काळाच्या शीर्षस्थानी असलेल्या नेत्याला ते आता किती थेट बोलू किंवा संपर्क करू शकतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कार्यकर्त्यांना नेता बनवणारी काँग्रेस आणि सध्या याच नेत्यांना पळवणारी भाजप सत्तेत असल्याने अनेकांना सत्तेची ऊब हवीहवीशी वाटते आहे. भलेही त्यांचा सन्मान तेथे असो वा नसो याची प्रचिती खूद्द नाना पटोले भाजपमध्ये असताना त्यांनी अनुभवली आहे. असो, मात्र भाजपला आयते नेते मिळाल्याने त्यांचे लाभार्थी कार्यकर्ते आपोआपच भाजपशी जुडले जात आहेत.पण नवीन नेतृत्व भाजपमध्ये किती निर्माण झाले? याचे उत्तर भाजपमधील नेते देतील? प्रश्न काँग्रेसचा उदोउदो करण्याचा नव्हे तर काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांचा ऊहापोह. जे कधी काळी काँग्रेस पक्षात कार्यकर्ते म्हणून काँग्रेसचा हात पकडण्याचा प्रयत्न करत होते . मात्र काँग्रेसने ज्यावेळी हातात हात घट्ट पकडला आणि त्यांना विविध पक्षातील व घटनात्मक पदे दिली. मात्र, काँग्रेस सत्तेतून घसरण्यास सुरुवात झाली की, त्याचं नेत्यांनी काँग्रेसचा हात हळूहळू निसटला सुरुवात झाली आणि जे नेते थेट गांधी परिवाराशी संवाद साधू शकत होते त्या नेत्यांनी सुध्दा काँग्रेसला धक्का दिला आणि भाजपचे कमळ हाती घेतले. मराठवाड्यातील दिग्गज नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री स्व.विलासराव देशमुख, माजी अशोक चव्हाण,स्व.राजीव सातव हे गांधी परिवाराशी थेट संवाद साधू शकणाऱ्या नेत्यांमध्ये, मराठवाड्याला त्यांचा अभिमान होता. कुठल्याही पक्षातील नेत्यांना या तिघांचा हेवा वाटायचा.स्व.राजीव सातव तर गांधी परिवाराच्या थेट किचन पर्यंत जाणारे नेते आज त्यांच्या पत्नी त्यांच्या पश्चात भाजपचे कमळ हाती घेत आहेत. आज राजीव सातव हयात असते तर प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश तर दूरच पण त्या राजकारणात असत्या का? हा प्रश्न. राजीव सातव यांना काँग्रेसने कुठेच कमी केले नाही. राजीव सातवांचा सन्मान काँग्रेसमध्ये कसा आहे याची जाणीव काँग्रेसमधील अनेकजणांना होती. राहुल गांधी यांच्यासोबत सावलीप्रमाणे राजीव सातव होते. राहुल गांधी आणि राजीव सातव यांची गोळजोडी म्हटले तर वावगे ठरणार नाही. राजीव सातव यांच्यानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना आधार दिला. विधान परिषदेवर संधी दिली. त्यांचा कार्यकाळ संपला की, काँग्रेस पक्षात अनेक दावेदार विधान परिषदेसाठी इच्छुक असताना, सोनिया गांधी यांनी त्यांना पुन्हा सर्व पक्षांतील विरोध डावलून विधान परिषदेवर संधी दिली. आजही सातव परिवाराचा शब्द काँग्रेस किंबहुना गांधी परिवार डावलत नसतात, अचानक प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसचा हात सोडण्याचा घेतलेला निर्णय त्यांना तरी कितपत पटत असेल? हा प्रश्न. राजकारण फक्त सत्तेसाठी आहे की, विचार पक्षनिष्ठा हे सुद्धा राजकारण आहे हे सध्या कळणे कठीण झाले आहे. पक्ष , त्याची विचारधारा, पक्षनिष्ठा या बाबी आता लोप पावत आहेत हे गेल्या दशकभरातील राजकीय उलथापालथीवरून लक्षात येते. राजकारणात चढ उतार येतात कोणीही सत्तेचा अमरपटट्टा घेऊन येत नसतो. याची जाणीव आणि भान उरले राहिले आहे काय? या प्रश्नाचे उत्तर दलबदलू नेत्यांच्या प्रसंगांतून लक्षात येते. तर काँग्रेस पक्षाने नेते निर्माण करून चूक केली म्हणावी लागेल. काँग्रेस पक्षाने काय नाही केले!

 

– पदमाकर उखळीकर,

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

मो. ९६३७६७९५४२.

विविध मागण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी यांचा आज पासून कामावर बहिष्कार: अद्यावत लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याची मागणी

विविध मागण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी यांचा आज पासून कामावर बहिष्कार: अद्यावत लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याची मागणी

 

पाथरी(प्रतिनिधी)दि. १५ डिसेंबर – राज्यातील ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी, जे ग्रामस्तरावर महसूल प्रशासनाची मुख्य जबाबदारी सांभाळणारे शासकीय प्रतिनिधी आहेत, ग्राम महसूल संघटनेच्या वतीने आज पाथरीचे तहसील दार शंकर हंदेश्वर यांना आपल्या मागण्याचे निवेदन देऊन आजपासून ऑनलाइन कामावर बहिष्कार टाकला आहे.अद्यावत लॅपटॉप आणि प्रिंटर न मिळाल्याने हे तलाठी आंदोलन सुरू झाले असून, ई-पीक पाहणी, ई-फेरफार, डिजिटल सातबारा यासारख्या सुधारित प्रणाली ठप्प होण्याची शक्यता आहे.

ग्राम महसूल अधिकाऱ्यांची भूमिका आणि आव्हाने

राज्यातील सुमारे १५ हजार तलाठ्या हे गावपातळीवर नागरिकांना तातडीची सेवा देण्याचे काम करतात. सातबारा नोंदणी, फेरफार, नुकसानीचे पंचनामे, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी यासारख्या अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर अवतरलेल्या आहेत. मात्र, संबंधित तलाठी आणि मंडळाकडे कालबाह्य व नादुरुस्त उपकरणे असल्याने कामात मोठा अडथळा येत आहे. २०१६ ते २०१९ या काळात दिलेली संगणकीय साधने आता पूर्णपणे खराब झाली असून, त्यावर ई-पीक पाहणी, ई-पंचनामा किंवा डिजिटल स्वाक्षरी यासारखी आधुनिक कामे करणे अशक्य झाले आहे.

तहसील पाथरी मधील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांचे DSC तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.

पाथरी तहसीलदारांना निवेदन

पाथरी तहसीलचे तलाठी संघटनेने तहसीलदार यांना निवेदन देत आज, दि. १५ डिसेंबर २०२५ पासून ऑनलाइन कामावर बेमुदत बहिष्कार जाहीर केला. निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे की, अद्यावत लॅपटॉप, प्रिंटर आणि इतर आयटी उपकरणे मिळेपर्यंत हा बहिष्कार कायम राहील. महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पूर्वीच अनेक वेळा निवेदने दिली होती. २८ नोव्हेंबरला अपर मुख्य सचिवांना आणि १७ ऑक्टोबरलाही इशारा देण्यात आला होता, पण शासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.

 

नादुरुस्त उपकरणांचा फटका

ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे, “सध्याच्या घडीला आम्ही कालबाह्य व नादुरुस्त उपकरणांवर काम करत आहोत. यामुळे ऑनलाइन प्रणालीतील नोंदी, प्रस्ताव मंजुरी आणि आवश्यक सेवा वेळेत देणे अशक्य झाले आहे.” गेल्या वर्षी भरती झालेल्या ३,२०० नवीन तलाठ्यांना अद्याप लॅपटॉप मिळालेले नाहीत. शासनाने २२ ऑगस्टच्या निर्णयानुसार जेईएम पोर्टलद्वारे खरेदीसाठी निधी उपलब्ध केला असला तरी निविदा प्रक्रिया रखडली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना पीकपाहणी, विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे यांसारख्या सेवांवर परिणाम होत आहे.

 

नागरिकांची गैरसोय आणि शासनाला इशारा

या तलाठी बहिष्कारामुळे शेतकरी आणि विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होत आहे. ई-पीक पाहणी ठप्प झाल्यास शेतकऱ्यांच्या अनुदानप्रक्रिया रखडतील, तर ई-फेरफार आणि सातबारा नक्कल विलंबित होईल. तलाठी संघटनेने निवेदनात शासनाला इशारा देत म्हटले आहे, “शासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन ग्राम महसूल अधिकाऱ्यांची अडचण दूर करावी. अन्यथा गावापासून शहरापर्यंतचे महसुली कामकाज ठप्प होईल.” निळकंठ उगले, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र तलाठी संघ यांनी सांगितले, “शासनाने आमच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी.”

 

शासनाची जबाबदारी

शासनाने तलाठ्यांना स्मार्ट करण्यासाठी इंटरनेट, लॅपटॉप यांसारखी उपकरणे दिली होती, पण त्यांची देखभाल आणि अद्ययावत करणे विसरले. या आंदोलनाने महसूल विभागाला जागा झाली असून, तातडीने उपकरणे पुरवठा करून नागरिकसेवा सुरळीत करण्याची गरज आहे. तलाठी आंदोलनाचा पुढील टप्पा काय, याबाबत संघटना सतर्क आहे. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनांवर ग्राम महसूल संघटनेचे पदाधिकारी मंडळ अधिकारी बागुल, कुलकर्णी(विटेकर),सोडगिर, ग्राम महसूल अधिकारी, रामप्रसाद कोल्हे,ए.एम.चव्हाण, एच.एस.सय्यद,राहुल सानप, विजय भदर्गे, राजु नरोटे, अदनान अन्सारी,ए.व्ही.पाते, श्रीनिवास तायनाक, समीउर रहमान कुरेशी,एम.टी.चव्हाण, अस्मिता जाधव,जी.एस.घाडगे,संदीप बडगुजर,इत्यादी ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत