Home Blog Page 2

अजित नावाचा झंझावात थांबला!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदा खासदार झाले तेव्हाचा माझा जन्म. राज्याच्या राजकारणात प्रचंड लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणजे अजित पवार. कोणत्याही पक्षातील नेते त्यांना आज आठवत असतील. राज्याच्या राजकारणात जेव्हा जेव्हा घडामोडी घडतात तेव्हा तेव्हा अजित पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. राजकारण करताना अजित पवार कधी गंभीर दिसले नाहीत. एक हसत खेळत राजकारण कसं करायचं हे त्यांच्याकडून अनेक राजकारण्यांना शिकण्यासारखं आहे.राजकारणात अजित पवार यांच्या नावाची चर्चा नाही असं कधी झालं नाही. त्यांचे निर्णय स्पष्ट असतं आणि त्या निर्णयाची फलश्रुती सुध्दा राज्याला मिळत. एखादा निर्णय घ्यावा वाटला तर ते त्यावर लगेच विचारविनिमय करून तत्काळ लागू करीत असत. असा राजकारणी पुन्हा होणार नाही. निर्णय घेण्यात सरकार किती वेळ घालवते आणि त्याची अंमलबजावणी तर तो निर्णय विस्मरणात गेल्यावर होते हे अनेकदा आपण पाहीले आहे. पण त्याबाबत अजित पवार यांनी कधी निर्णय घेतला आणि तो लागू होण्यास विलंब झाला असे कधी घडले नाही. त्यामुळे अजित पवार यांच्या नावाची चर्चा एक कर्तबगार उपमुख्यमंत्री झाली होती. अगदी कामात कुठलाही वेळ न दवडता ते काम नेटाने करीत असत. राज्याच्या राजकारणात सततेत असताना अजित पवार यांनी अनेकदा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. एक आर्थिक नियोजन आणि शिस्त त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना घालून दिली. त्यामुळे त्यांना राज्याच्या आर्थिक विकासाचा मापदंड माहिती होता. काँग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना त्यांनी राज्याची आर्थिक शिस्त कधी बिघडू दिली नाही. विरोधकांच्या टिकेला कधी त्यांनी मनावर घेतलं नाही अगदी हसत खेळत राज्याचा विकास करण्यासाठी ते धडपडत याची प्रचिती आपणांस विमान अपघात झाला त्या ठिकाणी अस्तव्यस्त पडलेल्या कागदोपत्रावरून लक्षात येते. कामाने झपाटलेला माणूस म्हटलं तर योग्य. भारतीय जनता पक्षाच्या सोबत अलायन्स करून देखील त्यांनी फुले -शाहू -आंबेडकर यांच्या विचारांशी फारकत घेतली नाही. हे ही त्यांच वेगळेपण म्हणता येईल. कामाचा पक्का वादा म्हणजे अजित दादा हे अगदी तंतोतंत लागू पडते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून काकाला वेटीस धरणाऱ्या पुतण्याणे एकट्याच्या हिमतीने २०२४ च्या राष्ट्रवादी फूटी नंतरच्या पहिल्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आणि नेतृत्व सिद्ध केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणूक झाली यात अपेक्षित यश आले नाही म्हणून अजित पवार यांच्यावर टीका झाली. मात्र, अजित पवार यांच्या सोबत जे खासदार आले होते ते पुन्हा निवडून आले. हे मात्र विश्लेषण करणारे विसरले. पण, विधानसभेतील अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला विजय अनेकांची तोंड बंद करणारा आणि शरद पवार यांच्या राजकीय खेळीला चाणक्य नीती मानणारा वर्ग गपगुमान झाला. काय कारण, जनतेने अजित पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले होते. राजकारणाची सुरुवात काका म्हणजे शरद पवार यांचे बोट धरून झाली असली तरी काकापेक्षा सरस पाऊल आणि गनिमी कावा नव्हे तर उघडउघड राजकारण अजित पवार यांनी केले. त्यामुळे राजकारणात त्यांना परखड आणि स्पष्ट राजकारणी म्हणून ओळखले जात.अजित पवार राजकारणाच्या पटलावर दिसणार नाहीत पण त्यांनी प्रत्येक माणसाच्या मनाच्या कप्प्यात आहेत. हे त्यांच्यातील स्पष्टवक्तेपणामुळे. काकांच्या छत्रछायेखाली वावरणाऱ्या अजित पवार यांनी छत्रछाया सोडली आणि स्वतः झाडं होऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला. हे वाटत तितकं नक्कीच सोपं नव्हतं कारण, शरद पवार यांच्यासारख्या वटवृक्षाखाली वाढलेले अजित पवार स्वतः ची वेगळी अजित अनंतराव पवार अशी ओळख निर्माण करतात. हे पवार कुटुंबियांसाठी सुखावह होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, राजकारणातली वैचारिक भुमिका प्रत्येकाची वेगळी असू शकते. तशी वैचारिक भुमिका अजित पवारांनी सिध्द करून दाखविली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी दाखवून दिले. अजित पवार हे नाव एक संघर्षचा झंझावात होता जो सतत धगधगता होता. राज्याच्या राजकारणात आणि विकासात कोणती भूमिका कधी घ्यायची याच अचूक गणित मला वाटतं त्याचं इतकं कुणाला असेल? विकासासाठी आमदार निधी त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी त्यांनी शक्य तितके प्रयत्न केले. सतत राजकारणातील चढता आलेख त्यांची उंची दाखवतो.१९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून आले, नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.त्यानंतर शरद पवार पी.व्ही. नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले.अजित पवार त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९, २०२४ असे सलग सात वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले.हा केवळ राजकीय वारसा असू शकतो?तर राजकीय वारश्यावर अनेकदा निवडणूक येणं शक्य नाही असं मला तरी वाटत. अजित पवार यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.एवढेच नव्हे तर त्यांनी ज्या ज्या पदांवर काम केले त्या त्या पदाला वेगळी ओळख निर्माण करून करून दिली ती त्यांच्या झपाटलेल्या कामातून. असो, त्यांच्या या अचानक अपघाती जान्याने मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. एक महत्वकांक्षी नेता म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्र आणि देश विसरणार नाही. राज्याच्या विकासाची दूरदृष्टी शांत झाली. भावपूर्ण श्रद्धांजली!


– पदमाकर उखळीकर ,
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)
मो. ९९७५१८८९१२.
kalpadmakarukhlikar@gmail.com

मतदान यंत्रांची आज एफएलसी

पाथरी(प्रतिनिधी) जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी पाथरी तालुक्यातील गट आणि गणाच्या निवडणुकीस वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्राची एफएलसी प्रक्रिया आज २३ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे ही प्रक्रिया सकाळी १०:३० वाजता पाथरीच्या

स्वातंत्र्यसैनिक दिगंबरराव चौधरी भारस्वाडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे होणार आहे यासाठी तालुक्यातील सर्व नोंदणी प्रत राजकीय पक्ष नामनिर्देशन वैध ठरलेल्या उमेदवाराने संबंधित ठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निर्णय अधिकारी संगीता चव्हाण व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शंकर हंदेश्वर यांनी केली आहे

कर्तृत्व, मेहनत अन् गुणवत्तेच्या जोरावरच जगणं सुंदर होणं शक्य- व्याख्याते गणेश शिंदे : परभणीत आई महोत्सवाला प्रारंभ; पाहिले पुष्प गुंफले

परभणी ता.22(प्रतिनिधी)माणसं लक्षात राहतात ती गुणांनी व कर्तृत्वाने, वरवरच्या गोष्टींनी माणसं मोठी होत नाहीत. तर कर्तृत्व, मेहनत अन् गुणवत्तेच्या जोरावरच आपलं जगणं सुंदर व समृद्ध होऊ शकते, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे (अहिल्यानगर) यांनी केले.

मानव सेवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्त्रीशक्ती, मातृत्व आणि कर्तृत्ववान मातांच्या योगदानाला उजाळा देण्यासाठी परभणी शहरातील समाधान नगरात श्री राजीव गांधी विद्यालयाच्या प्रांगणात दि. २१ ते २३ जानेवारी दरम्यान तीन दिवसीय आई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बुधवारी (दि. २१) संध्याकाळी व्याख्याते गणेश शिंदे यांचे “जीवन सुंदर आहे” या विषयावर प्रेरणदायी व्याख्यान झाले. त्यांनी व्याख्यानातून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बाल विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. न. चि.जाधव हे होते. याप्रसंगी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष केशव दुधाटे, सेवानिवृत वैद्यकीय अधिकारी डॉ.शांताबाई दत्तात्रेय वाघमारे (पूर्णा), सत्कारमूर्ती चंद्रकलाबाई शिवाजी कदम, सुनीता वै.धूळगुंडे, सविता नवनाथ फड, ज्येष्ठ नागरिक केशवराव भुसारे, गोपाळराव भुसारे, वाशीमचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

व्याख्याते शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, भावी पिढी सुसंस्कृत व्हावी यासाठी मुलांनी चांगले शिक्षण घेऊन मोठी स्वप्नं पाहावीत. त्यांनी चाकोरीबाहेरचा विचार करून उद्योग, व्यवसायात आलं पाहिजे. ज्ञान आणि अर्थार्जनाला आता कुठल्या भिंती उरल्या नाहीत. सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाइतका प्रभावी पर्याय नाही. जिद्द व मेहनतीच्या बळावर निश्चित यश मिळवता येते मात्र त्यासाठी पालकांनी हंटर घेऊन मुलांच्या मागे लागता कामा नये. आपले शेतकरी उत्पादन चांगले घेतात परंतु त्यांना विक्रीची कौशल्ये आत्मसात करता आली पाहिजेत. काळ आणि वेळेनुसार स्वतःला बदलण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शिकायला हवे. आपण सगळेजण वेगळे आहोत, आपल्यातील वेगळेपण ज्या दिवशी सापडेल तेव्हा जगणं सुंदर होईल, असेही ते म्हणाले. निसर्ग, समाज आणि अर्थकारण या तीन विषयांना स्पर्श केल्याशिवाय आपलं जगणं सुंदर करता येत नाही. आम्ही आमच्यात इतके गुरफटलो आहे की समाज, नातीगोती सहवास, सगळे विसरलो आहे. त्यामुळे ऐकमेकांना वेळ द्या, एकमेकांना भेटा, एकमेकांशी बोला. नाती जपा असे आवाहनही व्याख्याते शिंदे यांनी यावेळी केले.

प्रास्ताविक आई महोत्सवाचे संयोजक तथा शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी केले. आईच्या मायेचा, त्यागाचा आणि कर्तृत्वाचा गौरव म्हणून चंद्रकलाबाई शिवाजी कदम, सुनीता वै.धूळगुंडे, सविता नवनाथ फड यांना मान्यवरांच्या हस्ते मानपत्र व शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. मानपत्रांचे वाचन डॉ.दिलीप शृंगारपुतळे, सुभाष ढगे, बबनराव आव्हाड यांनी केले. मुख्य वक्त्यांचा परिचय बाळू बुधवंत यांनी करून दिला. सूत्रसंचलन डॉ.दिलीप शृंगारपुतळे तर आभार प्रदर्शन कवी केशव खटिंग यांनी केले. कार्यक्रमाला महिला व पुरुष नागरिक तसेच शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित राहिल्या

 

आज समारोप; कवी प्रशांत मोरे यांचा भावस्पर्शी कार्यक्रम

महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी शुक्रवारी (दि. २३) महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी प्रशांत मोरे यांचा “आई तुझा हात परिसर हा” हा भावस्पर्शी कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमातून आई आणि माणूस यांच्यातील नात्याचा भावनिक पदर उलगडला जाणार आहे. आईच्या कर्तृत्वाला, मातृत्वाच्या मूल्यांना आणि स्त्रीशक्तीच्या सन्मानाला समर्पित असलेला हा महोत्सव परभणीकरांसाठी एक प्रेरणादायी पर्व ठरला आहे.

तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी हिंद दी चादर गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम

नांदेड, दिनांक २३ (प्रतिनिधी):हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षाचे औचित्य साधून, आज पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड येथे गुरुवारी रात्री एका भव्य आणि विशेष कीर्तन समागमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ३५० शालेय विद्यार्थ्यांनी एका सुरात केलेले श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ‘शब्द गुरबानी’चे गायन, ज्याने उपस्थित संगतांना मंत्रमुग्ध केले.

पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड बोर्डाद्वारे आयोजित हा कार्यक्रम आज पार पडला. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचे ३५० व्या शहीदी समागम वर्ष निमित्ताने, ३५० विद्यार्थ्यांनी त्यांना ही अनोखी स्वरांजली अर्पण केली.

या कार्यक्रमास तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वाराचे जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी, बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ (से. नि.भाप्रसे), हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, जसवंत सिंग बॉबी, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक हरजीत सिंघ जी कडेवाले आदींची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या गुरबानीच्या पवित्र स्वरांनी संपूर्ण तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब परिसर आणि वातावरण भक्तिमय झाले होते. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी (संगत) मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. शालेय मुलांच्या या शिस्तबद्ध आणि भावपूर्ण सादरीकरणाचे मान्यवरांनी कौतुक करत त्यांना मार्गदर्शन केले.

 

निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संगीता चव्हाण यांनी घेतली विविध पथकांची आढावा बैठक

पाथरी, १७ जानेवारी: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ ची तयारी जोमात घेत असताना पाथरी येथील निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी श्रीमती संगीता चव्हाण यांनी विविध पथकांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. ही बैठक तहसील कार्यालयात पार पडली असून,निवडणूक प्रक्रिया नियोजनबद्ध व सुरळीतपणे राबवण्यासाठी सर्व पथकांना कडक सूचना देण्यात आल्या.राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा झाली असून, पाथरीसह परभणी जिल्ह्यातील तयारी गती घेत आहे.श्रीमती चव्हाण यांनी निवडणूक कामकाज यशस्वी करण्यासाठी आचारसंहिता पथक,मिडिया पथक,वाहन पथक,कर्मचारी प्रशिक्षण पथक,स्वीप पथक (सिस्टिमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड व्होटर पार्टिसिपेशन),खर्च पथक,साहित्य वाटप पथक,ईव्हीएम पथक,टपाली मतदान पथकासह इतर पथकांची नियुक्ती केली आहे. या प्रत्येक पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे जबाबदारीपूर्ण कामकाज पार पाडण्याचे आदेश दिले गेले.बैठकीत श्रीमती चव्हाण यांनी निवडणूक प्रक्रियाच्या प्रत्येक टप्प्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.आचारसंहिता पथकाला नियमांचे काटेकोर पालन करण्याचे सांगितले, तर मिडिया पथक व मिडिया नोडल अधिकारी संदीपान घुंबरे यांना निवडणूकविषयी सत्य माहिती प्रसारित करण्याचे निर्देश दिले.खर्च पथकाला उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्याबाबत सूचना करत,ईव्हीएम पथक व टपाली मतदान पथकाला मतदान यंत्रणेची तपासणी व सुरक्षितता सुनिश्चित करण्यास सांगितले.स्वीप पथकाला मतदार जागृतीसाठी विशेष मोहिमा राबवण्याचे आवाहन केले. तसेच,साहित्य वाटप पथक व वाहन पथकाला मतदार यादी व साहित्य वितरणात कोणताही अडथळा येऊ नये याची जबाबदारी सौंपली.श्रीमती चव्हाण म्हणाल्या, “निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा पाया आहे. सर्व पथकांनी दैनंदिन कामकाज उपस्थित राहून जबाबदारी पार पाडावी. अनुपस्थितीची गंभीर दखल घेतली जाईल व योग्य कारवाई होईल.” या सूचनांमुळे पथकातील सदस्यांमध्ये उत्साह दिसून आला. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार पाथरी श्री. शंकर एन. हांदेशवार,गटविकास अधिकारी श्री. शैलेश वाव्हळे,नायब तहसीलदार श्री. रमेश धोपे, श्री. वसंत महाजन,सहाय्यक महसूल अधिकारी श्री. रघुनाथ केसकर यांच्यासह सर्व पथकातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानेही निवडणूक तयारीसाठी विविध पावले उचलली असून,उपजिल्हाधिकारी निवडणूक श्रीमती अरुणा संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज वेग घेत आहे.[4][6] पाथरी उपविभागीय कार्यालयातून(sdmpathari@gmail.com, ०२४५१-२५५७७७) चालू असलेल्या या तयारीमुळे मतदारांना सुरळीत अनुभव मिळेल, अशी अपेक्षा आहे.पाथरी निवडणूक प्रक्रियेत संगीता चव्हाण यांचे नेतृत्व प्रशंसनीय असून, विविध पथकांच्या समन्वयामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक यशस्वी होईल. नागरिकांनीही मतदानात सहभागी व्हावे, ही आवाहन करण्यात आले. ही बैठक निवडणूक तयारीची मजबूत पायाभूत तयार करणारी ठरली.

वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी लागणार मार्गी? सेंटर नाका व बस स्थानकात कायमचा गोंधळ: पाथरीकर त्रस्त

 

पाथरी: शहराच्या हृदयस्थानी असलेल्या सेंटर नाका व बस स्थानक परिसरात दररोज वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचाचं होतोय. मुख्य रस्त्यावरून येणारी वाहने, दुचाकींचा मेळा आणि बसांच्या गर्दीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या गंभीर रूप धारण करत असून,वाहतूक कोंडीमुळे अपघातांची वाढ होतेय. पाथरीकरांच्या प्रश्नांना कधी मार्ग मिळणार?

oplus_8388610

पाथरी शहरात वाहतूक कोंडीही नित्याची समस्या बनली आहे. विशेषत:बस स्थानक परिसर व सेंटर नाका चौक हे दोन ठिकाणे वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरली आहेत. शहरातून जाणारा मुख्य रस्ता, शिक्षक कॉलनी रोड आणि पोलीस स्टेशन रोड अशा चार मार्गांचा संगम असलेल्या सेंटर नाक्यावर पोलीस ठाण्याच्या अवघ्या हाकेच्या अंतरावर असूनही वाहनांची गर्दी अनावर होते. सकाळी बाजार वेळेत, दुपारी शाळा-कॉलेजच्या वेळी आणि संध्याकाळी व्यावसायिक गर्दीमुळे या ठिकाणी तासभर कोंडी होते. यामुळे वाहनधारकांचा वेळ, इंधन खर्च होतो आणि चिडचिड वाढते.

oplus_8388610

सेंटर नाकाची समस्या फक्त गर्दीपुरती मर्यादित नाही. या चौकात चारही दिशांना येणारी वाहने एकाच वेळी धावल्याने छोटे-मोठे अपघात रोज होतात. दुचाकी चालकांची बेशिस्त वागणूक, चारचाकी वाहनांचे चुकीचे पार्किंग आणि रस्त्यांची खराब अवस्था यामुळे अपघातांची शयता नेहमीच कायम असते. एका वाहनधारकाने सांगितले, “पोलीस ठाणे जवळ असूनही वाहतूक पोलिस दिसत नाहीत. कधी तरी सिग्नल लावून नियंत्रण करावे लागते, पण तेही दुर्मीळ आहे.” परभणी जिल्ह्यातील इतर शहरांप्रमाणे पाथरीतही रस्ते अरुंद असल्याने ही कोंडी वाढते.

दुसरीकडे,बस स्थानक परिसरही तितकाच गंभीर. बसस्थानकातून निघणाऱ्या एसटी बसेसना मुख्य रस्त्यावरील हॉटेल शिमला व अंजली हॉटेलजवळ उभ्या राहिलेल्या दुचाकींमुळे मोठी अडचण येते. खरेदीसाठी आलेले ग्राहक रस्त्याच्या कडेला दुचाकी उभ्या करतात, ज्यामुळे बसांना मुख्य रस्त्यावर येण्यास अडसर निर्माण होतो. यात बसस्थानकाबाहेरील व्यापारी दुकानांजवळील वाहनांची गर्दी जोडली तर परिसर पूर्णपणे बंद होतो. परिणामी, प्रवासी उशीर होतो आणि अपघात टाळण्यासाठी चालकांना जोखीम घ्यावी लागते.

नागरिकांमध्ये एकच प्रश्न ऐकायला मिळतो –शहरात कुठेही वाहतूक पोलिस दिसत नाहीत!बाजार वेळेत किंवा गर्दीच्या वेळी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांची गरज आहे, पण ती पूर्णपणे नगण्य आहे. परभणी, घनसावंगीप्रमाणे पाथरीतही रस्त्यावर उभ्या वाहनांमुळे मुख्य मार्ग अडकतात. वाहनधारक मागणी करतात की,वाहतूक पोलिसांची नियुक्ती, सिग्नल सिस्टम आणि पार्किंगसाठी वेगळे जागा उपलब्ध कराव्यात. अन्यथा,वाहतूक कोंडीमुळे प्रदूषण वाढेल आणि अपघातांची संख्याही वाढेल.

oplus_8388610

पाथरी सारख्या वाढत्या शहरात ही समस्या शाश्वती पर्यायाशिवाय सोडवता येणार नाही. बाह्यवळण रस्ता, सार्वजनिक वाहतूक मजबूत करणे आणि पोलिसांना सक्रिय करणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेतल्यास पाथरीकरांना दिलासा मिळेल. अन्यथा,वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी लागणार मार्गी?

जिल्हा परिषद प्रा.शाळा पोहेटाकळी येथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन

 

15 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोहेटाकळी येथील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा शैक्षणिक सहलीचा आयोजन करण्यात आला. हा सहल विद्यार्थ्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ज्ञान वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता.शाळेच्या प्रशासन आणि शिक्षकांनी याच सहलीमध्ये विविध ऐतिहासिक स्थळांची यात्रा करुन दिली. या सहलीत विद्यार्थ्यांनी वेरूळ,खुलताबाद,दौलताबाद आणि छत्रपती संभाजीनगर येथील महत्त्वाचे पर्यटन स्थळांना भेट दिली. यामध्ये बीबी का मकबरा,सिद्धार्थ गार्डन आणि इतर अनेक ऐतिहासिक स्थळ समावेश होते.शिक्षकांनी हे सहल इतरच्या उद्देशाने नव्हे तर विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक जगातील सखोल परिचय करुन देण्यासाठी आयोजित केले. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या स्थळाचा इतिहास, महत्त्व आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी समजावून सांगण्यात आली. या शैक्षणिक सहलीचे माहौल अत्यंत आनंदीमय आणि शिक्षणदायक होते.

या सहलीचे आयोजन आणि यशस्वी राबविणेमध्ये शाळेतील मुख्याध्यापक अंभोरे यांचा मुख्य भूमिका होता. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे हा शैक्षणिक सहल अत्यंत सुव्यवस्थितपणे पार पडला.शाळेचे निलेश केदारे,रतन कदम सर, निर्मळ सर, शिंदे सर,मिसे सर आणि रोडे सर असे सर्व शिक्षकांनी या कामी मनोरंजकपणे परिश्रम घेतले. प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांचे सुरक्षा, आरोग्य आणि शिक्षणासंदर्भी सर्व आवश्यक काळजी घेतली.या सहलीने विद्यार्थ्यांच्या मनात खोल प्रभाव पाडला. ऐतिहासिक स्थळांना थेट भेट देऊन त्यांनी पाठ्यपुस्तकांपेक्षा खूप अधिक महत्त्वाचे ज्ञान आणि अनुभव मिळवले. हे सहल विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वविकासाला आणि सामाजिक जागरूकतेला सकारण ठरले.

डॉ. जगदीश शिंदे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

 

 

पाथरी,दि.17(प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश शिंदे यांनी आज शनिवार 17 जानेवारी रोजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शामराव धर्मे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुभाष आबा कोल्हे, माजी पंचायत समिती सदस्य नारायणराव आढाव, दिनेश रनेर आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, बाभळगाव जिल्हा परिषद गट हा महिला सर्वसाधारणसाठी राखीव आहे. या गटातून माजी सभापती सुभाषराव कोल्हे इच्छुक होते. मात्र वाढते वय लक्षात घेता त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या चिरंजीव अनिल कोल्हे हे कान्सूर गणातून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. बाभळगाव गटातून डॉ. जगदीश शिंदे यांच्या मातोश्री काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच बाभळगाव गणातून उमेदवार निश्‍चित करण्यासाठी चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे.

एकूणच काँग्रेस पक्षाकडून कासापुरी, लिंबा, बाभळगाव व देवनांद्रा या चारही गटांमध्ये नवतरुणांना संधी देण्यात आल्याने येथील उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. डॉ. जगदीश शिंदे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

    दरम्यान, काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात आलेली मरगळ दूर करून पक्षाला पुन्हा एकदा जिल्ह्यात अग्रस्थानी नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी जिल्हाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर स्पष्ट केले होते. त्याच भूमिकेतून नवतरुणांना संधी देत स्वच्छ चारित्र्याची आणि सक्षम नवी फळी उभारण्याचे काम ते करीत असल्याचे दिसून येत आहे.

उबाठा-काँग्रेस मनपात निर्विवाद सत्ता स्थापणार संयुक्त पत्रकार परिषदेत नेतेमंडळींचा विश्‍वास:सरकारने दुजाभाव करु नये

परभणी,दि.17(प्रतिनिधी) : परभणी महानगरपालिकेच्या निवडणूकीत जनशक्तीने धनशक्तीवर मात करीत शिवसेना उबाठा व काँग्रेसला मोठे मताधिक्य मिळवून दिले आहे. स्पष्ट बहुमत या आघाडीला मिळालेले असल्यामुळे आघाडीच महापालिकेत निर्विवाद सत्ता स्थापन करणार आहे, असा विश्‍वास या दोन्ही पक्षाच्या नेतेमंडळींनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांनी अक्षदा मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मनपात सत्ता स्थापनेचा दावा केला.

खासदार संजय जाधव म्हणाले, या विजयाचे श्रेय परभणीकरांना असून त्यांनी महाविकास आघाडीला भरभरुन प्रतिसाद देत स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करुन लोकहीतासाठी ही आघाडी काम करणार आहे. मात्र राज्य सरकारने या पालिकेला सवतीची वागणूक देवू नये. जिल्हा नियोजन समितीत सूत्रानुसार वाटा देवून जास्तीचा वाटा मनपासाठी द्यावा, अशी मागणी करीत पालकमंत्र्यांनी कटकारस्थान न करता आपण परभणीकर म्हणून शहराच्या विकासासाठी निधी देण्याचे काम करावे, असेही खासदार जाधव म्हणाले.आमदार डॉ. राहुल पाटील यांनी धनशक्ती विरोधात जनशक्तीला दिलेला हा कौल असून त्यामुळेच क्रांतीची मशाल पेटली गेली आहे. खासदार जाधव हे पाच टर्मपासून तर आपण तीसर्‍या टर्ममध्ये आमदार म्हणून काम करीत असल्यामुळे निधी कसा खेचून आणायचा, हे आम्हाला माहित आहे. शासनाकडे जनतेचा पैसा असल्याने तो स्वतःची मालकी समजू नये. दुजाभाव न करता विकासासाठी निधी द्यावा, अशी मागणी करतांना भाजपने पराभव स्विकारावा असे आवाहनही केले.

काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांनी जनतेने काँग्रेस व उबाठा शिवसेनेला स्पष्ट बहुमत देतांना सत्ता स्थापनेचा आशिर्वाद दिला आहे. त्यामुळे ही सत्ता निर्विवादपणे स्थापन करुन निश्‍चितच शहराच्या विकासासाठी आघाडी काम करेल, अशी ग्वाही दिली.  पत्रकार परिषदेस जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव, प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, शिवसेना महानगर प्रमुख डॉ. विवेक नावंदर, महिला जिल्हा प्रमुख अंबिका डहाळे, काँग्रेसचे माजी उपमहापौर भगवान वाघमारे, माजी उपमहापौर माजुलाला, सय्यद कादर, मुजाहीद खान, रविराज देशमुख, नदीम इनामदार, सूर्यकांत हाके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, सदाशिव देशमुख, तालुका प्रमुख नंदकुमार आवचार, संदीप झाडे, सुभाष जोंधळे, शहर प्रमुख ज्ञानेश्‍वर पवार, विशु डहाळे, बाळराजे तळेकर आदींची उपस्थिती होती.

सत्तेचे सूत्र ठरेल..

       काँग्रेस व उबाठा शिवसेना या आघाडीत शिवसेनेला सर्वाधिक 25 जागा मिळालेल्या आहेत. काँग्रेसला 12 जागा आहेत. त्यामुळे सत्ता स्थापन करतांना महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती या बाबत दोन्ही पक्षाची नेतेमंडळी संयुक्तपणे निर्णय घेईल. यामध्ये खासदार संजय जाधव यांची भूमिका महत्वपूर्ण ठरेल, असेही आमदार डॉ. राहुल पाटील यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.

 

 

जिल्हा परिषद निवडणुकीची घेतली बैठक

परभणी जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने तयारी जोरदार सुरू केली आहे. आजच्या कार्यक्रमात त्यांनी परभणी विधानसभा मतदार संघातील पदाधिकाजयांची आढावा बैठक घेतली. यावेळी गटनिहाय उमेदवारी बाबत चर्चा करण्यात आली.

खुनासह जबरी चोरी आणि दरोडा प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

 

परभणी(प्रतिनिधी)जिल्ह्यात मागील काही महिन्यांपूर्वी जबरी चोरी, दरोडा आणि खून स्वरूपाच्या गंभीर घटना सेलू तालुक्यातील वालूर येथे तसेच चारठाणा आणि परभणी ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत उघडकीस आल्या होत्या. या प्रकरणातील आरोपीस पोलिसांनी शुक्रवारी(दि. १६) परभणी तालुक्यातील झरी येथून शिताफिने ताब्यात घेतले.सेलू पोलिस स्टेशन हद्दीतील वालूर येथे एका महिला व पुरुषास जबर मारहाण करून आखाड्यावर झोपलेल्या एका मुलास डोक्यात मारहाण करून ठार मारल्याचे घटना घडली होती. याप्रकरणी सेलू पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभिर्यओळखून पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी आरोपीच्या शोधासाठी पथके स्थापन करून रवाना केली होती. या आदेशाने स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने परभणी ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील झरी येथे घटनास्थळी भेट देऊन फिर्यादींकडून सखोल माहिती प्राप्त केली. तसेच तांत्रिक तपास, आरोपीची अंगकाठी, गुन्हा करण्याची पद्धती याचा सखोल अभ्यास करून गोपनीय माहिती संकलित केली.

मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हा शाखेने आरोपी बाबुराव उर्फ बाबूशा सावळा पवार रा. पिटोरी शिरसगाव ता. अंबड जि. जालना आणि त्याचे दोन साथीदार असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान गुरुवारी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी बाबुराव उर्फ बाबूशा सावळा पवार(वय ६०) यास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सापळा रचून शिताफिने ताब्यात घेतले. आरोपीचे सखोल चौकशी केली असता त्याने सेलू, परभणी ग्रामीण आणि चारठाणा पोलिस ठाणे येथे दाखल विविध गुन्ह्यांची कबुली दिली.ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात आणि अपर पोलिस अधिक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, पोलिस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, पोलिस आमदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, विलास सातपुते, केशव लटपटे, रणजीत आगळे, रंगनाथ दुधाटे, मुकेश बुधवंत, पांडुरंग तुपसुंदर आणि गणेश कौटकर यांच्या पथकाने मिळून केली.