Home Blog Page 11

विकासाला मत देऊन बिहारी पुन्हा कामावर परतले!

 

बिहार विधानसभेच्या २४३ सदस्यांची निवड करण्यासाठी ६ ते ११ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या . मतमोजणी आणि निकालाची घोषणा १४ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) नेतृत्वाखालील महागठबंधन (एमजीबी) ला पराभूत करून प्रचंड विजय मिळवला. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार विक्रमी दहाव्यांदा शपथ घेतील. पहिल्यांदाच, बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राजद २०१० नंतर पहिल्यांदाच तिसऱ्या स्थानावर घसरला , तर कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) ने २०१० नंतरचा सर्वोत्तम निकाल नोंदवला. निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आयएनसी) ने वाईट कामगिरी केली, तर लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) आणि राष्ट्रीय लोक मोर्चाने पहिल्यांदाच जागा जिंकल्या.

बिहारमध्ये विशेषतः तरुण आणि सुशिक्षित पदवीधरांमध्ये बेरोजगारीचे गंभीर संकट आहे. संधींअभावी अनेक तरुण बिहारींना कामासाठी इतर राज्यात स्थलांतर करावे लागते. सत्ताधारी एनडीए आणि विरोधी महाआघाडीबंधन या दोघांनीही रोजगार निर्मिती आणि युवा सक्षमीकरणाची प्रमुख आश्वासने दिली होती, ज्यात प्रत्येक घरासाठी सरकारी नोकऱ्या, कौशल्य केंद्रे आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक पॅकेजेस अशी आश्वासने दिली होती. मतदारांनी मात्र नगदी हातात रक्कम कोणती आघाडी देते याकडे मतांची झोळी टाकली. पण,या बिहारींना महाराष्ट्र किंवा इतर ठिकाणी पोटापाण्यासाठी पुन्हा परतावे लागणार आहे. कारण, राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्तेत येण्यासाठी ज्याची युक्ती लढवली त्याला मतदार राजा बळी पडला असे म्हणता येईल.पण, मतदारांना मतदान झाले की, पुन्हा इतर राज्यात विशेषतः महाराष्ट्रात परतावे लागणार आहे हे ठावूक नसावे काय?हा प्रश्न जर विकासाच्या वल्गना निवडून दिलेले सरकार पूर्ण करणार असतील तर बिहारिंनी मतदान झाले किंवा निकालानंतर दुसऱ्या राज्यात का परतावे हा प्रश्न. म्हणजे निवडणून दिलेले विकासाभिमुख सरकारावर यांचा विश्वास नाही का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात. सांगण्याचा मतलब आता विकासाचे सरकार आले आहे तर निदान पोटापाण्याचा प्रश्न तरी सोडवेल आणि इतर दुय्यम गरजा नाही केल्या तरी चालतील हा विश्वास यायला हवाच.असो, मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे या विजयाबद्दल अभिनंदन केले पाहिजे.कारण, फक्त दहा हजार बिहारी महिलांना अमुल्य वाटले पण,महागठबंधन आघाडीने प्रत्येक घरात एकाला नौकरी देण्याचे आश्वासन अमुल्य वाटले नाही असो हा ज्याच्या त्याच्या सदसद्विवेकबुद्धीचा भाग.मात्र, महागठबंधन आघाडीला मतदारांनी बहुमताने निवडून दिले असते तर बिहारिंना पुन्हा मतदान करून परत महाराष्ट्र किंवा इतर राज्याचा आश्रय घेण्याची घाई झाली नसती हे उघडच. पण, असे होणार करणार या शक्यतेत बिहारी माणूस जगणारा नाही. असे म्हणता येईल. बिहार राज्यातून येणाऱ्या ट्रेन खचाखच भरून महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी येताना अनुभव येईल. कारण, जास्त दिवस उलटून गेल्यानंतर कामाची शाश्वती नाही. त्यामुळे लगेच परतून जाण्याची वेळ त्यांच्यावर आली की त्यांनी आणली याचा विचार आता करून उपयोग तो काय? इतके भयावह वास्तव बिहार राज्यात असताना बिहारी जनतेला थोडी कळ काढता आली असती तर आज प्रत्येक घरात एक सरकारी नौकरीधारक असता.हे आश्वासन महागठबंधन आघाडीला पूर्ण करावे लागेल असते,याचे प्रमुख कारण म्हणजे महागठबंधन आघाडीला येत असलेल्या अपयशामुळे. भाजप ३६५ दिवस निवडणूक मोडमध्ये आणि प्रत्येक बुथपर्यंत चोख नियोजन असते तर मग रेवड्या पिकविण्याची खरच गरज होती का? मतदार हा तात्पुरत्या आणि धार्मिक बाबतीत पुरता वेडावून गेला आहे आणि देशात सरकारही हिंदू हिंदू म्हणणाऱ्यांचे आहे. त्यामुळे हा चमत्कार असावा म्हटलं तर योथोचितच होईल?असो,२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांची न्याय योजना जनतेनेला नको वाटली.प्रत्येक महिन्यात आठ हजार रुपये नको असलेल्या देशात आणि त्याच देशातील राज्यांमध्ये प्रत्येकाच्या घरात सरकारी नोकरी नाकारत असेल तर यापेक्षा आगामी काळात काँग्रेस पक्षाने निवडणूक प्रचाराचा आयाम बदलायला हवा.सन्मानाने जगण्याची इच्छा नको असेल आणि राशन हवे असेल व हिंदू राष्ट्र हवे तर प्रचाराचा आयाम बदलला पाहिजे हे यासुद्धा निवडणूक निकालातून काँग्रेसला शिकावे लागेल.मात्र, लोकशाही तत्त्वांचे काय होणार हा काँग्रेस आणि गांधी परिवारचा मुद्दा.अन्यथा हिंदू राष्ट्र व्हायला वेळ नाही आणि पुन्हा धार्मिक सनातनी विचारांची गुलामी पत्करावी लागेल. हे उघड.

विरोधी पक्षांच्या महाआघाडीने मतदार यादीत फेरफार केल्याचे सत्ताधाऱ्यांवर आरोप केले होते . निवडणूक आयोगाने विशेष सघन सुधारणा केली, ज्यामुळे मृत, राज्याबाहेर स्थलांतरित किंवा डुप्लिकेट असलेल्या सहा दशलक्षाहून अधिक लोकांची नावे मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात वगळण्यात आली. विरोधी पक्षांनी या वगळण्यामुळे अल्पसंख्याक, महिला आणि स्थलांतरित कामगारांना अप्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप केला आणि कथित मतदार दडपशाहीविरुद्ध मोहिमा सुरू केल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर कथितपणे मते चोरल्याचा आरोप केला आहे. असे मुद्दे मांडूनही काँग्रेसला सपाटून आपटावे लागले. निदान काँग्रेसने या मुद्यावर ऐवढे बँकफूटवर येणं म्हणजे काँग्रेसला स्वबळावर लढण्याचा हा या निकालाने सल्ला दिला आहे. रोजगाराअभावी, दरवर्षी लाखो बिहारी तरुण इतर राज्यात स्थलांतर करतात. दोन्ही गटांनी स्थलांतर हा चर्चेचा विषय बनवला आहे, त्याचा थेट संबंध आर्थिक स्थिरता आणि खराब प्रशासनाशी संबंधित आहे. तरी पुन्हा नितिश कुमारावर मतदार मेहरबान असल्याचे दिसते. विविध सरकारी प्रयत्नांनंतरही, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा आणि शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये बिहार अविकसित आहे. अनेक ग्रामीण भागात पुरेसे रस्ते, वीज, रुग्णालये आणि शाळा उपलब्ध नाहीत. या कमतरता निवडणुकीच्या निकालांवर परिणाम करणाऱ्या मतदारांच्या सततच्या चिंता आहेत.त्या चिंतेला कायम मतदारांनी कवटाळले आहे.असो,भाजप आणि एनडीएचे अभिनंदन तर विकासाला मत देऊन बिहारी पुन्हा कामावर परतले! याबद्दल त्यांचेही अभिनंदन!

 

 

– पदमाकर उखळीकर,

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

मो.९९७५१८८९१२

kalpadmakarukhlikar@gmail.com

सामाजिक न्याय, लोकशाही आणि बीड जिल्ह्याच आश्वासक नेतृत्व!

नगराध्यक्ष हे नगरपालिका किंवा नगरपरिषदेचे प्रमुख असतात, नगराध्यक्ष हे नगरपालिकेचे दैनंदिन प्रशासन चालवण्यासाठी मदत करतात. नगराध्यक्ष वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि भूमिका पार पाडतात.प्रशासकीय प्रमुख म्हणून नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजाचे आणि प्रशासनाचे नेतृत्व करतात. नगरपालिकेच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवतात आणि निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात.स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व हा नगराध्यक्ष करत असतो.आपल्या शहरातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात आणि शहराच्या विकासासाठी काम करतात.एक चांगला नगराध्यक्ष असा असावा जो दूरदृष्टी असलेला, लोकाभिमुख, प्रामाणिक, पारदर्शक आणि सक्षम नेतृत्व देणारा असावा. त्याला शहरातील समस्यांची जाणीव असावी आणि त्यावर प्रभावीपणे तोडगा काढण्यासाठी नियोजन करता यावे.सकारात्मक गुण असणे आवश्यक आहे.तोच नगराध्यक्ष शहराचा सर्वांगीण विकास करू शकतो.

दूरदृष्टी: शहराच्या भविष्याचा विचार करून विकास योजना तयार करणारा असावा. लोकाभिमुख: जनतेच्या गरजा आणि समस्या समजून घेणारा आणि त्यांना प्राधान्य देणारा असावा. प्रभावी संवाद: जनतेशी आणि नगरपालिकेच्या सदस्यांशी स्पष्ट आणि प्रभावी संवाद साधणारा असावा.सक्षम नेतृत्व: निर्णय घेण्यास सक्षम असावा आणि आपल्या टीमला एकत्र घेऊन काम करणारा असावा.पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा: सर्व कामे पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे करणारा असावा.

जबाबदारी: शहराच्या विकासाची आणि लोकांच्या कल्याणाची जबाबदारी स्वीकारणारा असावा. नियोजन कौशल्य: समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आणि संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी चांगले नियोजन करता येणे आवश्यक आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या मते, नेतृत्वाची सुरुवात सेवेच्या भावनेतून होते, ज्यात साधेपणा, आत्म-शिस्त आणि सचोटी असणे आवश्यक आहे. खरा नेता म्हणून लोकांना अहिंसक मार्गाने प्रेरित करून, त्यांच्यामध्ये स्वातंत्र्य, न्याय आणि समानतेची मूल्ये जागृत करून एक परिवर्तन घडवण्याची क्षमता असायला हवी.

थोडक्यात, एक चांगला नगराध्यक्ष हा केवळ एक नेता नसून, तो शहरातील लोकांचा विश्वासू प्रतिनिधी आणि विकासकामांचा आधारस्तंभ असावा. नगराध्यक्ष कसा असावा याची प्रचिती बीडकरांना देतील तो आश्वासक आणि सर्वसमावेशक चेहरा म्हणजे पप्पू कागदे.सामाजिक न्याय ,लोकशाही आणि एक आश्वासक चेहरा म्हणून पप्पू कागदे बीडकरांना विकसनशील नव्हे तर विकसित चेहरा म्हणून बीडचा विकास करतील यात दुमत नाही. कारण त्यांनी एखादे सामाजिक कार्य हाती घेतले तर ते कार्य ते तडीस नेऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देतात याचा अनुभव बीडकरांना आला आहे. गायरान धारकांच्या प्रश्नावर त्यांनी राज्य व केंद्र सरकार दखल घेईल असे आंदोलने करून गायरान जमीन मिळवून दिली आहे तसेच राज्यात महिलांवर किंवा सर्वसामान्यांवर जिथे कुठे अत्याचार होतो त्या अत्याचाराविरोधात सरकारला आंदोलनाच्या माध्यमातून वेळोवेळी जाब विचारला आहे. हे सुद्धा बिडकरांनी आणि संबंध राज्याने पाहिले आहे. त्यांची धमक, प्रमाणिकरण आणि सक्रियता ही त्यांची जमेची बाजू राहिली आहे.बीड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असून , नगराध्यक्ष पदासाठी पप्पू कागदे यांच्या माध्यमातून शहराला विकास करण्याची नवी संधी मिळाली आहे ती संधी मतदारांनी दवडू नये. पप्पू कागदे यांचा जनसंपर्क सर्व पक्षीय मैत्री तसेच राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेतील सरकारमधील सत्तेतील कोणतेही पद नसताना, एक विश्वासू चेहरा म्हणून ओळखले जातात.

बीडकरांना आपला हक्काचा माणूस म्हणून पप्पू कागदे यांच्याकडे पाहिले जाते. विकासाची नेमकी दृष्टी कशी असावी. सर्वसामान्यांचे बांधिलकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणून पप्पू कागदे यांच्याकडे पाहता येईल. त्यामुळे आगामी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नगर परिषद निवडणुकीत परळीचा नगराध्यक्ष म्हणून पप्पू कागदे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनी सर्वसामान्यांना लाभ मिळावा यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. गेल्या कित्येक वर्षापासून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्र किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरही आहे . त्यामुळे बीडच्या विकासाबाबत निश्चित असे म्हटले तर योग्य. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांच्याशी एकनिष्ठ राहून , यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजपयोगी कार्यक्रम पप्पू कागदे यांनी राबविले आहेत .

एक सामाजिक भान कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आहेत. आज शहरातील प्रत्येक वार्ड आणि गल्लीबोळात त्यांच्या नावाची नगराध्यक्ष म्हणून चर्चा होत आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांना पसंती असल्याचे नागरिक सांगत आहेत. खरंतर बीडकरांना ही चालून संधी चालून आली आहे त्याचा योग्य तो उपयोग बीडकरांनी करावा ही अपेक्षा.

 

 

– पदमाकर मुजमुले,  (लेखक पीएम फाऊंडेशनचे अध्यक्ष असून मुक्त पत्रकार आहेत.) मो.९९७५१८८९१२.

हेच संस्कार पुढच्या पिढीत येतील?

एकमेकांचा आदर राखण्याची संस्कृती जवळजवळ लोक पावली म्हटले तरी वावगे ठरणार नाही .अगदी वाढत्या शहरीकरणामुळे आणि मॉडर्न जगाच्या पाठीमागे असलेला माणूस हळूहळू संस्कृतीशी फारकत घेताना दिसत आहे . त्यामुळे वर्तमानात जिथे कुठे संस्कृती टिकून आहे ती भविष्यात किती टिकेल हा प्रश्न , उभा असताना आत्ताच संस्कृती कुठेतरी नष्ट होताना दिसत आहे .याचे कारण म्हणजे गुरुजनांचा किंवा वडिलांचा आदर किंबहुना मोठ्या व्यक्तींचा सन्मान राखण्याची संस्कृती किंवा संस्कार ज्यांना मिळाले आहेत त्यांनी ते अजूनही टिकून ठेवले आहेत . परंतु , संस्कार आपल्यात निर्माणही केले पाहिजेत . गुरुजनांचा सन्मान राखणं किती राहिले आहे. याउलट थोरा मोठ्यांचा सन्मान राखण्याऐवजी त्यांची अवहेलना केली जाते .किंबहुना त्यांच्याशीच मैत्री करून कुठलेही वयाचे अंतर लक्षात न घेता वागले जाते . दिवसीय महिला क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूने प्रशिक्षकाचे पाय धरले .यावरून संस्कृती कुठेतरी टिकून आहे . किंबहुना संस्कार अजूनही आहेत हे दिसले. मात्र, हे संस्कार पुढच्या पिढीत किती राहतील कारण आत्ताची पिढी संस्काराशी फारकत घेत असताना पुढची पिढीमध्ये संस्कार ठेवेल काय? हा प्रश्न. संस्कार पिढ्यानपिढ्यापासून आलेली शिदोरी आहे, ती शिदोरी पुढच्या पिढीला आपण दिली तर संस्कार टिकतील आणि एक सजग समाज निर्माण होईल. एकमेकातील आदर ठेवला जाईल अन्यथा संस्कार हे काय असतात हे विसरून जावं लागेल. कारण यंत्राच्या बरोबरीने वेग करण्यासाठी प्रयत्नशील असलेला माणूस हा यंत्र होऊन बसला आहे. तसं त्यानं यंत्रमानव हे नाव देऊन यंत्रमानव तयार केला आहेच. तर कृत्रिम बुद्धिमत्ता ही सुद्धा माणसाच्या विचाराप्रमाणे कृती करेल. पण, हळूहळू भावनाहीन बनत चाललेल्या मानवात आदरभाव कसा निर्माण होईल? हा प्रश्न. आपण आधीच्या पिढीचा विचार करू ज्यापूर्वी यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या शब्दाचा उगम व्हायचा होता. त्यावेळची पिढी आणि आजची कृत्रिम बुद्धिमत्तेत गुंतलेली पिढी यामध्ये आदरभाव कमी झाल्याचे आपल्या लक्षात येईल. जगाबरोबर आपल्याला वेग पकडावा लागेल यात दूमत नाही. पण, संस्कार हा भाग आपल्या जीवनात राहणार का? हा प्रश्न.आपण जगाच्या बरोबरीने वाटचाल करीत असू आणि केली तरच आपण जगाच्या विकासात टिकून राहू. पण संस्कार हे मानवाच्या दैनंदिन जगण्याचे आणि माणूस असल्याचे जीवंत आहे. अन्यथा आपल्यात आणि इतर प्राण्यांच्यामध्ये फरक तो काय? भारत हा केवळ देश नाही तर सर्वांत मोठी लोकशाही आणि संस्कृती संवर्धन आणि संस्कारच उत्तम उदाहरण आहे जगासाठी! आपली ओळख ही जगात वेगळी आहे ती यामुळेच. आपण कितिही मोठं झालो किंवा यश संपादन केले तरी आपला नम्रपणा हा यश आणि आपला विजय आहे. त्यामुळे संस्कारक्षम पिढी घडवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे आणि त्याची सुरुवात कुटुंबातून घरातून झाली पाहिजे. आपण, काय करावे, काय करू नये.याबाबत मुलांना कठोरपणे निर्बंध घालतो. मात्र, आदराने आणि नम्रपणे कसे वागले पाहिजे याबद्दल किती सांगतो हा विषय संशोधनाचा होईल.याचा परिणाम होतो तो म्हणजे पुढची पिढी वृद्ध आईवडिलांना सांभाळत नाही. त्यामुळे वृध्दाश्रमांची संख्या आपण वाढवत आहोत.हा संस्काराचा भाग आहे. दिवसेंदिवस माणूस एकलकोंडा आणि आत्मकेंद्री आणि संकुचित विचारांचा होतो आहे.हा संस्कृती आणि संस्काराचा भाग आहे. आजकालची मुलं – मुली आई -वडील किंवा कुटुंबातील मोठ्यांचे पाय धरून नम्र होतात का? कुटुंबाचा आदर किती राखतात?जर आजकालची तरुण पिढी कुटुंबात नम्र नसतील तर ती पोरं इतरांचा आदर किती राखत असतील? भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे.भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिला विश्वचषक जिंकल्याची नोंद झाली आहे.या ऐतिहासिक विजयावेळी भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार होते. त्यामुळे इतिहास हा याचीही आणि कर्णधार असलेल्या हरमनप्रीत कौर यांचीही नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकल्यानंतर मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. संस्कारचा हा क्षण जगाने पाहिला.हा क्षण २ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर घडला, जेव्हा भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून आपले पहिले-वहिले विश्वचषक विजेतेपद पटकावले. हा विजय भारतीयांना मिळवून देणाऱ्या संघाचे कौतुक करावे तितके थोडेच.
भारताची संस्कृती आणि संस्काराची ओळख झाली ती कर्णधार असलेल्या हरमनप्रीत कौर यांनी प्रक्षिक्षकाचे पाय धरून आशीर्वाद घेतल्याने.खर तर भारताची संस्कृती आणि संस्कार, सभ्यता, नम्रता वेळोवेळी दिसून येते.हे वेगळेपण इतर राष्ट्रांत किती आहे हा विषय वेगळा पण भारतीय संस्कृती आणि संस्कार विजयाच्या उत्साहातही आपण विसरत नाही, हा संदेश हरमनप्रीत कौर यांनी जगाला दाखवून दिला. भारत ही महापुरुषांची, संस्काराची भूमी आहे.हा संदेश जगाला दिला असला तरी आपण संस्कार विसतोय की, काय याचा विचार व्हावा हा या लेखामागील उद्देश .ऐवढेच .

– पदमाकर उखळीकर ,
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)
मो.९९७५१८८९१२.
kalpadmakarukhlikar@gmail.com.

शिक्षक साहित्य संमेलनात बुक स्टॉल व सेल्फी पॉईंट ठरणार खास आकर्षणाचे केंद्र

 

परळी प्रतिनिधी. परळी वैजनाथ येथे 16 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या 7 व्या मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनात बुक स्टॉल व खास शिक्षक व साहित्यिकांसाठी उभा करण्यात येणारा सेल्फी पॉईंट खास आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या टॉवर जवळील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात रविवार,दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी सातवे मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी व विडंबनकार प्रभाकर साळेगावकर यांच्या हस्ते होणार आहे.संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध विचारवंत व साहित्यिक अजयकुमार गंडले तर स्वागताध्यक्षपदी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे हे आहेत.शिक्षक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सकाळी 10 वाजता उद्घाटन सोहळा व शिक्षक गौरव पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे. तसेच दिवसभर परिसंवाद कथाकथन आणि कवी संमेलन असे विविध सत्रात कार्यक्रम होतील.
उद्घाटन समारंभात उत्कृष्ट चित्रकला शिक्षक व प्रसिद्ध कवी सिद्धेश्वर इंगोले यांच्या संकल्पनेतून साकारलेले शिक्षकांच्या विविध गुणधर्माचे दर्शन घडविणारा सेल्फी पॉइंट याचे उद्घाटन होणार आहे. शिक्षक साहित्य संमेलनात येणारे साहित्यिक, शिक्षक, साहित्यरसिक , परळीकर यांच्यासाठी हा सेल्फी पॉईंट खास आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.

निवडणूक आचारसंहिता; काय करावे, काय करु नये ?

मा. राज्य निवडणूक आयोगाने परभणी जिल्ह्यातील नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 बाबतचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. जिल्ह्यातील सात नगरपरिषदांच्या (गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, आणि पूर्णा) सदस्य पदासाठी आणि थेट अध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता 2 डिसेंबर रोजी मतदान व 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार असल्यान या सर्व नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात दि. 4 नोव्हेंबर 2025 पासून आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात काय करावे व काय करू नये याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

काय करावे – चालू असलेले कार्यक्रम / योजना पुढे सुरु ठेवता येतील. ज्याविषयी शंका निर्माण होईल अशा बाबींच्या संबंधात, राज्य निवडणूक आयोग/महानगरपालिका आयुक्त / जिल्हाधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण / मान्यता प्राप्त करण्यात यावी. पूर, अवर्षण, साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी साह्यकारी व पुनर्वसनाच्या उपाययोजना चालू करता येतील व या संदर्भात चालू असलेल्या योजना पुढे सुरु ठेवता येतील. मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रक्कम किंवा वैद्यकीय सवलती देण्याचे समुचित मान्यतेने पुढे चालू ठेवता येईल. मैदानासारख्या सार्वजनिक जागा सर्व पक्षांना/ निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना निवडणूक सभा घेण्यासाठी निःपक्षपातीपणे उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व पक्षांना / निवडणुकीस उभे असलेल्या उमेदवारांना हेलिपॅडच्या वापर निःपक्षपातीपणे उपलब्ध करुन दिला पाहिजे.

विश्रामगृहे, डाकबंगले व इतर शासकीय निवासस्थाने वगैरे बाबतीत निवडणूक आयोगाने व त्या अनुषंगाने शासनाने काढलेल्या आदेशास संपूर्णतः अधीन राहून सर्व राजकीय पक्षांना व निवडणुकीस उभे असलेल्या सर्व उमेदवारांना समानतेच्या तत्त्वावर उपलब्ध करुन देता येणे अनुज्ञेय असल्यास त्याप्रमाणे देण्यात यावेत. इतर राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्यावर करण्यात येणारी टीका ही त्यांची धोरणे, कार्यक्रम, पूर्वीची कामगिरी, पार पडलेली कामे, केवळ या बाबींशी संबंधित असावी.

शांततामय व उपद्रवरहित गृहस्थ जीवन जगण्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या अधिकाराचे पूर्णपणे जतन करण्यात यावे. प्रस्तावित सभेची जागा व वेळ याविषयी स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना पूर्ण माहिती देण्यात यावी आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळविण्यात याव्यात. प्रस्तावित सभेच्या जागी निर्बंधात्मक व प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्यांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. आवश्यक असल्यास त्याबाबत सवलत मिळण्याविषयी अर्ज केले पाहिजेत व वेळीच अशी सवलत मिळविली पाहिजे. प्रस्तावित सभेसाठी ध्यनिक्षेपक (Loudspeaker) किंवा कोणत्याही इतर अशा सवलतीचा वापर करण्यासाठी योग्य परवानगी मिळविली पाहिजे. सभेमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा अव्यवस्था निर्माण करणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध करण्यासाठी पोलीसांचे सहाय्य मिळविण्यात यावे.

कोणत्याही मिरवणुकीची प्रारंभीची वेळ व जागा, मिरवणूक ज्या मार्गाने जाईल तो मार्ग व मिरवणुकीची अखेर होईल अशी वेळ व स्थान ही बाब आगाऊ स्वरुपात निश्चितपणे ठरविण्यात यावी व पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी. मिरवणूक ज्या वस्तीमधून जात असेल त्या वस्त्यांबाबत कोणतेही निर्बंधात्मक आदेश जारी केलेले असल्यास त्या विषयी खात्री करुन त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे सर्व वाहतूक नियमांचे व अन्य निर्बंधांचे अनुपालन करण्यात यावे. मिरवणुकीमुळे वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ देऊ नये. ज्यांचा क्षेपके किंवा हत्यारे म्हणून गैरवापर होऊ शकेल अशा कोणत्याही वस्तू मिरवणुकीत सहभागी असलेल्या व्यक्तींनी बाळगू नयेत.

मतदानाचे काम शांतता व सुव्यवस्थेने पार पडावे यासाठी सर्वतोपरी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य देण्यात यावे. उमेदवार व त्याच्या अधिकृत कार्यकर्त्यांनी विहित परवानगी घेऊन योग्य असे बिल्ले व ओळखपत्रे, निवडणूक प्रशासनाकडून मिळवावीत व ती निवडणुकीचे काम करणाऱ्या व्यक्तींनी ती दर्शनी भागावर लावावीत. मतदारांना देण्यात येणाऱ्या ओळखचिठ्ठया साध्या (पांढऱ्या) कागदावर देण्यात येतील व त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे किंवा पक्षाचे नाव यांचा निर्देश असणार नाही. मतदानाच्या दिवशी वाहनांच्या वापरावरील निर्बंधांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे.
राज्य निवडणूक आयोगाचे, महानगरपालिका आयुक्त यांचे अथवा जिल्हाधिकाऱ्यांचे किंवा त्यांनी प्रधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने दिलेले वैध प्राधिकारपत्र असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही वेळी मतदान कक्षात प्रवेश करता येणार नाही. वरच्या दर्जाच्या कोणत्याही व्यक्तींना (उदा. मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, संसद सदस्य, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य) यांनाही यातून सूट देण्यात आलेली नाही. निवडणूक पार पाडण्याच्या संबंधातील कोणतीही तक्रार किंवा समस्या, निवडणूक निर्णय अधिकारी/ क्षेत्र / प्रभाग दंडाधिकारी यांच्या किंवा राज्य निवडणूक आयोग यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी. राज्य निवडणूक आयोग आयुक्त, महानगरपालिका/ जिल्हाधिकारी/ निवडणूक निर्णय अधिकारी यांचे निवडणुकीच्या विविध पैलूंच्या संबंधातील सर्व बाबींविषयीचे निर्देश/ आदेश/अनुदेश यांचे पालन करण्यात यावे.

काय करु नये — शासकीय वाहने किंवा कर्मचारी वर्ग किंवा यंत्रणा यांचा निवडणूक प्रचारविषयक कामासाठी वापर करण्यात येऊ नये. शासकीय वाहनात पुढील कार्यालयाच्या वाहनाचा समावेश असेल, (1) केंद्र शासन (2) राज्य शासन (3) केंद्र व राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम, मंडळे, महामंडळे (4) केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त क्षेत्रातील उपक्रम (5) स्थानिक स्वराज्य संस्था (6) महानगरपालिका (7) नगर परिषदा/ नगर पंचायती (8) पणन मंडळ (कोणत्याही नावाचे) (9) सहकारी संस्था (10) जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या ग्रामपंचायती (11) ज्यामध्ये सार्वजनिक निधी मग तो एकूण निधीच्या हिश्यातील कितीही अल्पांशाने असो गुंतवण्यात आला आहे अशी कोणतीही संस्था व (12) संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, राज्य शासन, केंद्रीय पोलिस संघटना इत्यादीच्या मालकीची असलेली पुढील वाहने-मालमोटारी, लॉरी, टेंपो, जीपगाड्या, मोटारगाड्या, ऑटोरिक्षा, बसगाड्या, विमाने, हेलिकॉप्टर, जहाजे, बोटी, हॉवर क्रॉफ्ट व इतर सर्व वाहने.

सत्तेमध्ये असलेला पक्ष/शासन यांनी साध्य केलेल्या उद्दीष्टांबाबत सरकारी कोषागाराच्या खर्चाने कोणतीही जाहिरात देऊ नये. कोणत्याही वित्तीय अनुदानाची घोषण करणे, कोनशिला बसविणे, नवीन रस्ते इ. बांधण्याचे वचन देणे इत्यादी गोष्टी करु नयेत. शासन/सार्वजनिक उपक्रम यांच्या सेवेत कोणत्याही तदर्थ (Ad hoc) नियुक्त्या करु नयेत. मंत्री (राज्यमंत्री व उपमंत्रीसहित) हे उमेदवार असल्याखेरीज किंवा प्राधिकृत प्रतिनिधी असल्याखेरीज किंवा मतदानासाठी मतदार या नात्याने असेल त्याखेरीज मतदान कक्षामध्ये किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार नाहीत. निवडणूक मोहिम/प्रचार यांच्या जोडीने कोणतेही सरकारी काम पार पाडण्यात येऊ नये.

मतदारास आर्थिक किंवा अन्य प्रकारचे कोणतेही प्रलोभन दाखविण्यात येऊ नये, मतदाराच्या जातीय व धार्मिक भावनांना आवाहन करण्यात येऊ नये. विभिन्न जाती, जमाती यांच्यातील किंवा धार्मिक किंवा भाषिक गटातील मतभेद ज्यामुळे अधिक तीव्र होतील किंवा परस्परातील वैमनस्य वाढेल किंवा त्यांच्यात तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृत्ती करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये. इतर पक्षांचे कोणतेही नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक कार्याशी संबंधित नसेल अशा त्यांच्या खाजगी जीवनातील कोणत्याही पैलूवर टीका करण्याची परवानगी देण्यात येऊ नये. ज्यांचा खरेखोटेपणा पडताळून पाहिलेला नाही असे आरोप ठेवून किंवा त्यास विकृत स्वरूप देऊन इतर पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर टीका करण्यात येऊ नये.

निवडणूक प्रचार तसेच भाषणे, निवडणूक प्रचाराचे फलक, संगीत इत्यादी साठी कोणत्याही प्रार्थनास्थळांचा वापर करण्यात येऊ नये. लाच देणे, आवजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, खोट्या नावाने मतदान करणे, मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहोचविणे व तेथून परत नेणे यासारख्या भ्रष्ट प्रथा किंवा निवडणूक विषयक अपराध करण्यास प्रतिबंध आहेत. व्यक्तींची मते किंवा कृत्ये याविरुध्द निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने किंवा धरणे धरण्यात येऊ नये.

कोणत्याही व्यक्तीला, अन्य कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत आवारभिंत इत्यादींचा वापर त्यांच्या मालकांच्या परवानगीखेरीज करणे, ध्वजदंड उभारणे, कापडी फलक लावणे, नोटीशी चिकटविणे किंवा घोषणा लिहिणे इत्यादी करता येणार नाही. यामध्ये शासकीय, सार्वजनिक व खाजगी जागांचा समावेश असेल. इतर राजकीय पक्षांच्या किंवा उमेदवारांच्या सार्वजनिक सभांमध्ये किंवा मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करण्यात येऊ नये.

एका पक्षाची जेथे सभा चालू असेल अशा जागी दुसऱ्या पक्षाद्वारे मिरवणूक काढण्यात येऊ नये, दुसऱ्या पक्षांनी किंवा उमेदवारांनी लावलेली प्रचारपत्रके, भित्तीपत्रके काढून टाकण्यात येऊ नयेत, मात्र याबाबत काही आक्षेप असल्यास पोलिसांच्या किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणावे. मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठया वितरीत करण्याच्या जागी किंवा मतदान कक्षाजवळ प्रचारपत्रके, पक्षांचे ध्वज, चिन्हे किंवा इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करु नये. ध्वनिक्षेपकांचा मग ते एकाच जागी लावलेले असोत किंवा फिरत्या वाहनांवर बसविलेले असोत, सकाळी 6.00 वाजण्यापूर्वी किंवा रात्री 10.00 वाजल्यानंतर आणि संबंधित प्राधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी घेतलेली असल्याखेरीज वापर करु नये. तसेच याबाबत असलेले The Noise Pollution (Regulation and Control) Rules, 2000-ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

तसेच संबंधित प्राधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी असल्याखेरीज सार्वजनिक सभेच्या जागी किंवा मिरवणुकीत किंवा प्रचारफेरीत ध्वनिक्षेपकाचा वापर करु नये. अशा सभा/ प्रचारफेरी रात्री 10.00 वाजल्यानंतर चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येणार नाही. याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे तसेच घालून दिलेल्या अटींचे पालन करावे. याखेरीज, ती स्थानिक कायदे, त्या क्षेत्रातील सुरक्षिततेच्या आवश्यकतेचा स्थानिक दृष्टीकोन आणि हवामान, सणासुदीचे दिवस, परिक्षेचा काळ यांच्या अधीनतेने असतील. निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या पैशाचे, मद्याचे, वस्तूंचे वाटप करण्यात येऊ नये.

कलेक्टर आणी एसपी साहेब पाथरीत चालु आहे तरी काय?;अवैध धंदे जोरात सुरू आहेत;अवैध धंद्यावर कोणाचा वरदहस्त

कलेक्टर आणी एसपी साहेब पाथरीत चालु आहे तरी काय?;अवैध धंदे जोरात सुरू आहेत;अवैध धंद्यावर कोणाचा वरदहस्त

 

पाथरी(प्रतिनिधी) पाथरी तालुक्यामध्ये गुन्हेगारी अवैध वाळू,अवैध इत्यादी गौण खनिज चोरी,गुटखा,बिंगो नावाचा मटका,जुगार व गुंडगिरीला चालना मिळणारे अनेक अवैध धंदे पाथरी मध्ये सुरू असताना याकडे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब व पोलीस अधीक्षकांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे असून पाथरी शहरामध्ये चालू असलेले अवैध धंदे यावर कायमस्वरूपी बंदी येणार का असा प्रश्न जनसामान्यातून विचारला जात आहे.

 

शहरामध्ये राहणाऱ्या मोठ्या गुटखा माफियांवर पाथरी पोलिसांकडून कधी होईल ठोस कारवाई

पाथरीमध्ये अवघ्या  ठाण्याच्या आवारा पासूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रत्येक पान टपऱ्या प्रत्येक किराणा दुकान चहाच्या हॉटेल्स इत्यादी ठिकाणी व बस स्टँड परिसर,शेलु कॉर्नर, पोखर्णी फाटा,सोनपेठ फाटा,सेलू फाटा इत्यादी ठिकाणी असलेल्या पान टपरी असतील चहाच्या हॉटेल्स असतील या ठिकाणी विविध प्रकारचे गुटके त्यामध्ये मावा असेल बाबारत्ना असेल किंवा नवीन नवीन मार्केटला वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा पाथरी शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होत असताना पाथरी पोलीस याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करते की काय यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.या सर्व प्रकाराकडे पाथरी पोलीस प्रशासनाचे तर दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे परंतु त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने पाथरी तालुक्यामध्ये अशी ठोस कारवाई झाल्याचे अध्यापही ऐकावयास मिळत नाही.पाथरी शहरासह ग्रामीण भागामध्ये हा गुटखा पोहोचवणारे गुटखा माफिया मात्र खुलेआम ग्रामीण भाग व शहरांमध्ये गुटखा पोहोचवत असून या गुटखा माफियांवर पाथरी पोलिसांकडून कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

पाथरी तालुक्यामध्ये अवैध वाळू उपसा व वाहतूक चालू महसूल प्रशासनाकडून मात्र कुठलीही कारवाई नाही

पाथरी तालुक्यातील मौजे गुंज गोंडगाव,उमरा येथून मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर केणीच्या साह्याने दिवस-रात्र वाळू उपसा सुरू असताना महसूल प्रशासनातील तलाठी मंडळ अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून कुठलीही कारवाई का करण्यात येत नाही ही चर्चा जनसामान्यांमध्ये रंगू लागली आहे याकडे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष देऊन पाथरी तालुक्यात चालू असलेला अवैध वाळू उपसा बंद करतील का अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

0-4608×2592-0-0-{}-0-12#

 

गुंज खुर्द येथे रात्रीच्यावेळी 20-25 ट्रॅक्टरच्या सहाय्याने रात्री वाळू उपसा सुरु

सदरील ठिकाणचा फोटो उपलब्ध नसल्याने हा फोटो काल्पनिक घेतला आहे

पाथरी तालुक्यामध्ये गोदावरी नदीचे पात्र मोठे असून त्यामध्ये नाथरा ते मुदगल पर्यंत असं गोदावरीचा पात्र आहे.परंतु मागील काही काळामध्ये काही अधिकारी व पोलिसांच्या संगणमताने पाथरी तालुक्यामध्ये अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर चालू आहे मधल्या काळात गोदावरी नदीला पाणी आल्याने काही काळ गोदावरी नदीमधील अवैध वाळू उपसा बंद होता परंतु मागील आठ ते दहा दिवसापासून गुंज खुर्द येथील नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने गुंज खुर्द येथे रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत 20 ते 25 ट्रॅक्टरने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे.यामध्ये गावचे ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा इतर गाव गाडा चालवणाऱ्यांचे नातेवाईकच असल्याचे बोलले जात आहे.ग्रामपंचायत गुंजखुर्द येथील ग्रामपंचायतीवर ठोस कारवाई करण्याची गरज असून जेणेकरून या ठिकाणी चालू असलेला अवैध वाळू उपसा बंद होईल.

 

तालुक्यातील अवैध दारू विक्री कधी होणार बंद

 पाथरी तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणामध्ये होत असून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये अवैधरित्या देशी दारू असेल यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. तालुक्यातील मौजे गुंज,बाभळगाव,रामपुरी, ढालेगाव,रेणाखळी,हादगाव,वाघाळा कासापुरी,नाथरा लोणी इत्यादी ठिकाणी मोठ्याप्रमाणावर याकडे पोलिसांबरोबरच औषध व अन्न प्रशासनाकडून देखील दुर्लक्ष केले जात आहे

 

विकास कामाच्या नावाखाली इच्छुकांकडून अवैध गौणखणीजाची चोरी

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भावी जिल्हा परिषद सदस्य भावी पंचायत समिती सदस्य इत्यादींकडून ग्रामीण भागामध्ये विकास कामाच्या नावाखाली कुठलीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज(मुरुम)उत्खनन मोठ्या करून गाव शिवारातील रस्ते इच्छुकांकडून करण्यात येत असून या विकास कामाच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडणुकीत गावकऱ्यांकडून भरघोस मतदान मिळेल या आशेने अवैध गौण खनिजाची चोरी करून विकास कामे करण्यात येत असल्याचे सध्या पहावयास मिळत आहे.

 

शहरामध्ये विंगो नावाच्या मटक्याने घातला धुमाकूळ;लाखो रुपयाची उलाढाल

शहरामध्ये सध्या चर्चेमध्ये असलेला विषय म्हणजे विंगो नावाचा मटका या जुगारामध्ये दहा रुपयाला शंभर रुपये असे काही मिनिटातच मिळत असल्याने या विंगो नावाच्या मटक्याकडे शहरासह ग्रामीण भागातील अनेक तरुण वळाले असून या जुगारापायी अनेक युवकांचे व नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असून जो पैसा त्यांच्या संसारात वापरायचा आहे तो पैसा या विंगो नावाच्या मटक्यात घालून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर दिसून येत आहेत. या मटक्या पायी अनेक तरुण व नागरिक हे चुकीच्या मार्गाला लागली आहेत.त्यामुळे चोऱ्या आणि गुंड प्रवृत्ती सध्याच्या तरुण आणि युवक वर्गामध्ये पहावयास मिळत आहे.

 

शहरातील वाहतुकीला कधी लागणारे शिस्त

 

0-4608×2592-0-0-{}-0-12#

शहरांमधून जात असलेला राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले असून शहरांमध्ये चालणारे तीन चाकी ऑटो, मोटरसायकल,जड वाहने मोठ्या प्रमाणावर बेसिस्तपणे चालवताना दिसून येत आहेत. यामध्ये शहरातील सेलू कॉर्नर बस स्थानकासमोरील मुख्य रस्ता व चक्क पोलीस स्टेशन समोर असलेल्या चौकामध्ये देखील बेसावधपणे वाहन चालवणारे वाहन चालक दिसून येत आहेत यामुळे शहरांमध्ये नेहमीच छोटे-मोठे अपघात होत असतात याकडे मात्र पाथरी पोलिसांचे लक्ष असल्याचे दिसून येत आहे यावर पाथरी पोलीस काय बंदोबस्त करणार याकडे जनसामान्याचे लक्ष लागला आहे.