Home गुन्हेगारी परभणी पोलिस ॲक्शन मोडवर -कोम्बिंग ऑपरेशनमधून ६२ फरार आरोपी ताब्यात -अवैध शस्त्र धारकांवर धाड ; संशयितांची घरझडती

परभणी पोलिस ॲक्शन मोडवर -कोम्बिंग ऑपरेशनमधून ६२ फरार आरोपी ताब्यात -अवैध शस्त्र धारकांवर धाड ; संशयितांची घरझडती

परभणी पोलिस ॲक्शन मोडवर  -कोम्बिंग ऑपरेशनमधून ६२ फरार आरोपी ताब्यात  -अवैध शस्त्र धारकांवर धाड ; संशयितांची घरझडती
Oplus_131072

परभणी(प्रतिनिधी)महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलीस ॲक्शन मूडमध्ये असून शनिवारी(दि. ११)रात्री बारा ते दोन या दरम्यान एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशनमधून शहरासह जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेले आणि न्यायालयीन वॉरंटमधील आरोपींची धरपकड करण्यात आली.

मोहिमेदरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अग्निशास्त्र परवानाधारकांची घरझडती घेण्यात आली. तसेच घातक शस्त्रांचा वापर करणाऱ्या गुन्हेगारांच्या घरांची देखील झाडाझडी घेण्यात आली. या दरम्यान एक तलवार, खंबीर ताब्यात घेण्यात आली. गुन्हेगारी टोळ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्या हालचालींना आळा घालण्याच्या दृष्टीने हे कोम्हिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

या ऑपरेशनमध्ये वॉरंट आणि गुन्ह्यांमध्ये फरार असलेले एकूण ६२ आरोपी अटक करण्यात आले असून अवैधशास्त्र बाळगणाऱ्या ५८ आरोपींची घरझडती घेण्यात आली. मोहिमे दरम्यान परभणी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील झरी येथील ज्ञानेश्वर उद्धव पवार(वय ३०) याच्या घरातून एक तलवार जप्त करण्यात आली. याप्रकरणी त्याच्यावर परभणी ग्रामीण पोलीस भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी शहरात वींद्र सिंग नानकसिंग टाक रा. गुरुगोविंदसिंग नगर याच्या ताब्यातून एक खंजीर घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परभणी शहरात नाकाबंदी दरम्यान एका मोटरसायकल स्कुटी धारकाकडून पाच लाख साठ हजार रुपयांची रोख रक्कम मिळून आली. वसंत शंकरराव जटाळ(वय ४७) रा. ज्ञानेश्वर नगर साखला प्लॉट हे वाटीका हॉटेल वसमत रस्ता येथे मॅनेजर असल्याचे सांगितल्यावर एफएसटी पथकाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

Oplus_131072

ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात आणि आपण पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात दोन उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हा शाखेचे प्रभारी अधिकारी, २५ पोलीस अधिकारी, अमलदारानी, १९ पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी आणि १९० पोलीस अंमलदार यांच्या सहभागातून पार पडली.

_______

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here