Home महाराष्ट्र योगेश्वरी शुगर कारखान्याच्या विरोधात शेतकरी आक्रमक आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा

योगेश्वरी शुगर कारखान्याच्या विरोधात शेतकरी आक्रमक आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा

योगेश्वरी शुगर कारखान्याच्या विरोधात शेतकरी आक्रमक  आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा

पाथरी(प्रतिनिधी)लिंबा येथील योगेश्वरी शुगर कारखान्याकडून शेतकऱ्यांची आडवणूक केली जात असल्याचा आरोप करत कारखान्यासमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने साखर आयुक्तालय यांना निवेदनाद्वारे दिला आहे. लिंबा येथील योगेश्वरी शुगर हा कारखाना येथील कर्मचारी तोडणीदार आणि वाहतूकदार यांनी मिलीभगत करून शेतकऱ्यांच्या नोंदीप्रमाणे ऊस तोडणी करून गाळपास घेऊन न जाता त्यांची पैशांसाठी आडवणुक करत असून जे शेतकरी एकरी पाच ते दहा हजार रुपये देतील त्यांच्याच उसाची तोड करून गळफास घेऊन जात आहेत असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाने या निवेदनात केला आहे.

त्यामुळे लहान क्षेत्र असलेले आणि गरीब शेतकरी यांच्या ऊसाची तोडणी तारीख उलटून दोन ते तीन महिने होऊ नये ऊस तोडणी अभावी जागेवर उभा आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तीन दिवसात कारखान्याने आमचा ऊस तोडणी करून गाळपास घेऊन गेले नाही तर 15 जानेवारीला कारखान्यासमोर सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाचा देण्यात आला आहेया निवेदनावर सुदाम कोल्हे, डिगंबर कोल्हे, बालासाहेब शेळके, मुकुंद कोल्हे, अमित कोल्हे, सुमित कोल्हे, ऋषिकेश कोल्हे, नारायण कोल्हे, निवास कोल्हे, गोविंद कोल्हे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे निवेदन पाथरी उपयोगी अधिकारी कार्यालय यांनाही देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here