Home गुन्हेगारी कोठाळ्या चा युवक धनंजय बोचरे याची कर्जबाजारी  व नापिकी ला त्रासून गळफास लावून आत्महत्या

कोठाळ्या चा युवक धनंजय बोचरे याची कर्जबाजारी  व नापिकी ला त्रासून गळफास लावून आत्महत्या

कोठाळ्या चा युवक धनंजय बोचरे याची कर्जबाजारी  व नापिकी ला त्रासून गळफास लावून आत्महत्या

 

सोनपेठ प्रतिनिधी:-(सुभाष सावंत) सोनपेठ तालुक्यातील कोठाळा ता सोनपेठ. जि.परभणी गावचा तरुण युवक धनंजय शिवाजी बोचरे ( भोसले) वय वर्ष ३८ यांनी यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतजमीन नापीक झाल्यामुळे पीक कर्ज फेडणे कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण. स्वतःचे व्यसन या सर्वांची सांगड बसत नव्हती. तो सतत आर्थिक विवंचनेत असल्यामुळे जास्तीचे व्यसन करू लागला होता. नैराशी पोटी तो कुटुंबीयां सोबत बोलून दाखवायचा.दि ८ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे स्वतःच्या शेतात गेला. शेत सर्वे नंबर ४६/२ डिगोळ शिवारात असलेल्या जांभळीच्या झाडाला स्वतःने गळफास लावून घेऊन स्वतःचे जीवन संपवले. धनंजय बोचरे यांच्या मृत्यू पश्चात पत्नी दोन मुले वृद्ध आई-वडील यांचे संगोपन करणारा करता पुरुष गेला आहे. या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धनंजय च्या अकाली आत्महत्येची कोठाळा गगावात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोनपेठ पोलीस स्टेशन येथे. धनंजय चे नातेवाईक रावसाहेब बोचरे यांच्या फिर्यादीनुसार अकाली मृत्यू २/२६ नुसार नोंद घेऊन पो नी अशोक गीते यांच्या आदेशाने पो हे १२७ जाधव व त्यांचे सहकारी पुढील कार्यवाही करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here