Home धार्मिक बुद्धधम्म विश्वाला एकसंघ ठेवणारा – पूज्य भदंत थेपवन्नीसुंथरम

बुद्धधम्म विश्वाला एकसंघ ठेवणारा – पूज्य भदंत थेपवन्नीसुंथरम

बुद्धधम्म विश्वाला एकसंघ ठेवणारा – पूज्य भदंत थेपवन्नीसुंथरम

बुद्धधम्म विश्वाला एकसंघ ठेवणारा – पूज्य भदंत थेपवन्नीसुंथरम

परभणी(प्रतिनिधी)भारत भूमीमध्ये अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत बुद्धांचा जन्म झाला. त्यामुळे भारतभूमी ही संपूर्ण विश्वात पवित्रस्थान मानली जाते, संपुूर्ण जग हे बुद्धांमुळे भारताला वंदन करते. भारत बुद्धांमुळे विश्वगुरू मानला जातो. बुद्धाचा धम्म आधुनिक युगाला तारणारा, एकसंघ ठेवणारा आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील पूज्य भंते थेपवन्नीसुंथरम यांनी केले. ते तालुक्यातील मांडाखळी-उमरी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत गुरूवारी(दि. ८)बोलत होते.

आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे त्यांच्या पुढाकारातून पहिल्या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले. परिषदेचे उद्घाटन पूज्य भंते थेपवन्नीसुंथरम (थायलंड) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भदंत डॉ. आग्रहेरा कश्यप थेरो (श्रीलंका), भदंत काँग धम्मलोक (व्हिएतनाम), भंते शरणानंद महास्थविर, भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भदंत प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो, भदंत डॉ. इंदवंश महाथेरो, भदंत डॉ. धम्मदीप महाथेरो, भंते पय्यानंद थेरो, भदंत मोगलायन आदींसह देश – विदेशातील भिक्खू संघाची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेंद्रपाल गौतम, सिनेअभिनेते गगन मलिक, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार राजेश विटेकर, काँग्रेस जिल्हाधक्ष बाबाजानी दुर्राणी, श्रीलंका येथील धम्मउपासिका कौशल्य विक्रम शिंदे, थायलंड येथील अभिनेत्री मिस पावीरीसा, मिस अलिसा (ऑस्ट्रेलिया), मिस उमाफोन (थायलंड), कॅप्टन डॉ. नटकटी, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, प्रा. डॉ. भीमराव खाडे, डॉ. बी. टी. धुतमल उपस्थित होते. परिषदेच्या सुरुवातीस धम्मध्वजाचे ध्वजारोहण भिक्खू संघाच्या हस्ते करण्यात आले. यानंतर उपस्थित उपासक – उपासिकांनी पुष्पवृष्टी करून भिक्खू संघाचे स्वागत केले. दरम्यान तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करण्यात आले. उपस्थित मान्यवर व भिक्खू संघाच्या हस्ते दीपप्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिशरण, पंचशील दिले. आयोजक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांच्या वतीने भिक्खू संघाला चिवरदान करून स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविकात डॉ. हत्तीअंबिरे म्हणाले की, लवकरच येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्धविहार उभे केले जाणार आहे, जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त ही आंतरराष्ट्रीय धम्म परिषद घेण्याचा संकल्प मी केला होता. तो आज पुर्ण होत आहे. बौद्ध धम्माचा अनुयायांनी आपल्या कृती व आचरणातून आदर्श घालून द्यावा, समाज विकासासाठी धम्मविचार प्रत्येकामध्ये रुजवणे गरजेचे आहे. या परिषदेच्या माध्यमातून भारत हा बौद्धमय करण्याच्या दिशेने वाटचाल होत आहे. दरवर्षी ८ जानेवारीला आंतरराष्ट्रीय बौद्धधम्म परिषद आयोजित केली जाईल, असे सांगितले.

यावेळी भिक्खू संघाची धम्मदेशना संपन्न झाली. या परिषदेस बौद्ध उपासक – उपासिकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. परिषदेचे सूत्रसंचालन डॉ. सुनिल तुरुकमाने यांनी केले. आभार राहुल वाहिवळ यांनी मानले. (छाया – शैलेश डहाळे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here