Home महाराष्ट्र आम्ही दीलेले अश्वासने पूर्ण करतो; इतरांसारख्या भूलथापा मारत नाही – आ. राजेश विटेकरांनी माजी आमदार वरपुडकरांवर साधला निशाना

आम्ही दीलेले अश्वासने पूर्ण करतो; इतरांसारख्या भूलथापा मारत नाही – आ. राजेश विटेकरांनी माजी आमदार वरपुडकरांवर साधला निशाना

आम्ही दीलेले अश्वासने पूर्ण करतो; इतरांसारख्या भूलथापा मारत नाही – आ. राजेश विटेकरांनी माजी आमदार वरपुडकरांवर साधला निशाना
oplus_8388610

आम्ही दीलेले अश्वासने पूर्ण करतो; इतरांसारख्या भूलथापा मारत नाही – आ. राजेश विटेकरांनी माजी आमदार वरपुडकरांवर साधला निशाना

 

पाथरी(वार्ताहर): पाथरी मतदारसंघातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यात आमदार राजेश विटेकर यांनी माजी आमदार सुरेश वरपुडकर यांचे नाव न घेता जोरदार प्रत्यय केला. “आम्ही हाती घेतलेले काम नेहमीच पूर्ण करत आहोत. केवळ आश्वासने देणारे नाही, तर प्रत्यक्ष कामे उभी करणारे आहोत,” असे सांगून त्यांनी इतर नेत्यांच्या निवडणूक भूलथापांवर टीका केली.

oplus_8388610

२६ डिसेंबर शुक्रवार रोजी पोहेटाकळी येथे आयोजित सामाजिक सभागृह, शाळेत दोन वर्ग खोल्यांचे बांधकाम, शाळेची संरक्षण भिंत, हनुमान मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक, इत्यादी विकास कामांचा भव्य भूमिपूजन समारंभात पाथरी विधानसभाचे आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते अनेक महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती दादासाहेब टेंगशे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिल नखाते,माधवराव जोगदंड, संजय काका रणेर, पंचायत समितीचे माजी सभापती राजेश ढगे, बाळासाहेब कोल्हे,रमेश तांगडे, विष्णुपंत काळे,संतोष चव्हाण, अण्णासाहेब झुटे,विठ्ठलराव घांडगे,विष्णुपंत घांडगे,भरत घांडगे,संजय वाकणकर,अंकुश वाकणकर,विजय गलबे,महादेव ढवळे,सरपंच शामराव गोंगे, उपसरपंच गणेश बागल,बापूराव गोंगे,मुरली गोंगे,ज्ञानोबा गोंगे, भीमराव गोंगे,अशोक उजगरे,शिवाजी उजगरे पोलीस पाटील राहुल घुगे, तंटामुक्ती अध्यक्ष आबासाहेब गोंगे यांच्यासह स्थानिक नेते,पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा पाथरी मतदारसंघातील विकासकामांना गती देणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.

oplus_8388610

यावेळी बोलताना आ. विटेकर म्हणाले, “इतर नेते निवडणुकीच्या तोंडावर अनेक आश्वासने देतात. एखाद्या कामाचा शुभारंभ करायचा, मटेरियल आणून टाकायचा आणि निवडणुका झाल्या की उचलून घेऊन जायचा.चालू असलेली कामे अपूर्ण ठेवायची आणि पुन्हा निवडणुका आल्या की तीच कामे सुरू करायची. असे भूलथापा आम्ही मारत नाही. आम्ही हाती घेतलेली कामे दिलेल्या वेळेत पूर्ण करतो. दिलेला शब्द निभावतो.” या बोलीभाषेतून त्यांनी अप्रत्यक्षपणे माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या कारकीर्दीतील अपूर्ण प्रकल्पांवर बोट ठेवले.विटेकर हे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पाथरीतून निवडून आले असून,त्यांनी सुरेश वरपुडकर यांना १३,२४४ मतांच्या फरकाने पराभूत केले होते.

पाथरी मतदारसंघातील विकासकामांचा उल्लेख करताना आ. विटेकर म्हणाले, “आम्ही केवळ आश्वासने नाही तर कामे पूर्ण करणारे आहोत. पोहेटाकळी येथील हे भूमिपूजन त्याचाच ठोस पुरावा आहे. येथील रस्ते, पाणीपुरवठा,शाळा मूलभूत कामे लवकरच पूर्ण होणार आहेत.” या सोहळ्यात ग्रामस्थांनी त्यांच्या भाषणाला टाळ्या आणि जल्लोषाने दाद दिली. स्थानिक नेते दादासाहेब टेंगशे यांनीही विटेकरांच्या विकास धोरणाची प्रशंसा केली आणि येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

oplus_8388610

विटेकर पुढे म्हणाले, “येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आम्हाला आपले सहकार्य मिळावे.नाकी भूलथापा देणाऱ्यांना नाही.आम्ही पाथरी विधानसभामधील प्रत्येक गावापर्यंत विकास पोहोचवणार आहोत.” हे विधान राजकीय वातावरणात चर्चेचे केंद्र ठरले आहे. माजी आमदार वरपुडकर यांच्या कारकिर्दीतील अपूर्ण प्रकल्पांची आठवण करून देणाऱ्या या प्रत्ययाने स्थानिक राजकारणात नवीन चिंगारी पेटवली आहे.या भूमिपूजनाने परभणी जिल्ह्यातील ग्रामीण विकासाला चालना मिळेल, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.राजेश विटेकर यांच्या या आक्रमक भूमिकेने पाथरी मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.सविस्तर बातमी पुढील प्रमाणे पोहे टाकळी येथे.

 

 

 

पोहेटाकळी चे उपसरपंच गणेश बागल यांनी आमदार विटेकर यांच्याकडे केली विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी.

oplus_8388610

पोहे टाकळी येथे आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते विविध विकास कामाच्या भूमी पूजन प्रसंगी पोहे टाकळी येथे आले असता.पोहेटाकळीचे उपसरपंच गणेश बागल यांनी पोहेटाकळी येथील बारव मजबुतीकरण व सुशोभीकरणासाठी अंदाजीत ४५ लाख, हिंदू स्मशानभूमी सुशोभीकरण अंदाजित २० लाख रुपये व बौद्ध स्मशानभूमी साठी सुरक्षा भिंत तसेच सुशोभीकरणासाठी ३५ लाख असा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे पाथरी मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here