पाथरीत कोण मारणार बाजी
बाबाजानी दुर्राणी,राजेश विटेकर की सईद खान?
अवघ्या काही वेळातच मतपेटीचे पिटारे खुलणार काउन्टडाऊन सुरु
पाथरी (प्रतिनिधी)राजकीय दृष्ट्या परभणी जिल्ह्यामध्ये सर्वांचं लक्ष असलेली पाथरी नगरपालिका अध्यक्षासह नगरसेवकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. तब्बल १९ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अवघ्या काही वेळातच निवडणुकीचा निकाल मतमोजणीतून होणार आहे.या निकालाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.कारण या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी,राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेश विटेकर,अल्पसंख्यांक विभागाचे शिवसेना प्रदेशाध्यक्ष सईद खान यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून अवघ्या काही वेळातच पाथरी नगरपालिकेवर कोणाचं अधिराज्य असणार आहे हे स्पष्ट होणार आहे.
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असलेल्या पाथरी नगरपालिका निवडणुकी अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची मानली जात आहे. या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी,राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेश विटेकर,अल्पसंख्यांक शिवसेना प्रदेशाध्यक्ष सईद खान अशी सरळ लढत पाथरी मध्ये पहावयास मिळाली होती.

आता १९ दिवसाच्या प्रतिक्षेनंतर अवघ्या काही वेळातच म्हणजे १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीची पूर्ण तयारी प्रशासनाकडून आली असून पाथरी नगरपालिकेवर कोणाचे वर्चस्व असणार हे अवघ्या तासांमध्येच समोर येणार आहे. आत्ता काही तासाभराचा काउन्टडाऊन सुरू झाला आहे.