शरद गोविंदराव पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी झाला , आज शरद नावाचा सह्याद्री ८५ वर्षांचा झाला आहे. पण,त्याची उंची, कणखरपणा आणि ताट असलेला स्वाभिमान कुठेच कमी झालेला नाही. सह्याद्री वयाने कमी किंवा असतो का? तो पर्वत चट्टान आहे तो त्याच डौलाने उभा आहे.वादळे आली गेली मात्र,तो उभाच आहे. पद्मविभूषण शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तसेच पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे.देशाला कृषी मंत्रालय आणि कृषी मंत्री आहे याची जाणीव शरद पवार कृषिमंत्री झाले तेव्हा कृषी मंत्रालयाची ओळख झाली यापेक्षा कल्पना आली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गट पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाचे नेतृत्व करतात. तसेच महाविकास आघाडी या प्रादेशिक राजकीय आघाडीचे अध्यक्ष आहेत.जेव्हा शरद पवारांनी जसा पुलोदचा प्रयोग केला तसा प्रयोग त्यांनी महाविकास आघाडी स्थापन करून केला.मात्र, यावेळी काँग्रेस सोबत होती तर पुलोदच्या प्रयोगावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाशी बंडखोरी केली होती. असो,ते केवळ राजकीय कारकीर्दीत स्थिरावले नाहीत तर राजकारणाच्या बाहेर, शरद पवार यांनी २००५ ते २००८ पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि २०१० ते २०१२ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले. ऑक्टोबर २०१३ ते जानेवारी २०१७ या कालावधीत ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते.२०१७ मध्ये, भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.या विविधांगी अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आज ८५ वा वाढदिवस. एवढ्या वयातही ते कधी थकत नाहीत ही अत्युच्च शक्ती येते कुठून?हा महाराष्ट्रातील प्रत्येकाला पडलेला सवाल.ज्याच उत्तर अनुत्तरीतच.
१० जून इ.स. १९९९ रोजी शरद पवारांनी काँग्रेस पक्षाशी दोन हात करून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. इ.स. १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला अथवा आघाडीस बहुमत मिळाले नव्हते. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली होती आणि विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले. इ.स. २००४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला. २२ मे इ.स. २००४ मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. २९ मे इ.स. २००९ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्यांची धुरा त्यांना देण्यात आली.कृषी मंत्री म्हणून त्यांनी स्वतः ची आणि कृषी मंत्रालयाची ओळख देशात कानाकोपऱ्यात निर्माण केली. जुलै इ.स. २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षकार्याला अधिक वेळ देण्याची इच्छा असल्याचे सांगून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांनी आपल्यावरील कार्यभार कमी करण्याची विनंती केली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.इ.स. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाला ५४ जागा मिळाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाआघाडीचे सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात शरद पवार यांचा मोलाचा सहभाग होता. शरद पवार हे नाव नाही तर ते एक महाराष्ट्राला आणि देशाला न उलगडलेले कोडे आहे. कारण, शरद पवार यांना सत्तेची ऊब जवळ हवी वाटते.हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील घडामोडींवरून लक्षात येते. पुलोदचा प्रयोग असेल किंवा महाराष्ट्रातील सरकार स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग असेल. या न उलगडलेल्या कोड्याला पुतणे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोड्यात टाकले , जुलै २०२३ मध्ये, अजित पवार यांनी शरद पवारांच्या विरोधात बंड केले आणि सत्ताधारी भाजप- शिवसेना सरकारमध्ये सामील झाले आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, राष्ट्रवादीच्या बहुसंख्य विद्यमान आमदारांनी पवार यांच्या समर्थनार्थ पक्ष सोडला. पण, शरदचंद्र नावाचा हिमालय डगमगला नाही .कारण, हिमालयाला धडका दिल्याने त्याचा टवका निघू शकतो.पण, हिमालय जमीनदोस्त झालेला ऐकिवात आहे काय?
अभेद्य राजकीय कारकीर्द आणि अफाट शक्ती उर्जा आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या कुणासाठी टणक तर कठीण कधी मृदू असलेल्या पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

– पदमाकर उखळीकर ,
(लेखक पीएम फाऊंडेशनचे अध्यक्ष असून,मुक्त पत्रकार आहेत.)
kalpadmakarukhlikar@gmail.com.