Home गुन्हेगारी वाळूच्या २६ वाहनांसह ३ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त -बोरी पोलिसांची धडक कारवाई; १७ जणांवर गुन्हा दाखल

वाळूच्या २६ वाहनांसह ३ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त -बोरी पोलिसांची धडक कारवाई; १७ जणांवर गुन्हा दाखल

वाळूच्या २६ वाहनांसह ३ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त     -बोरी पोलिसांची धडक कारवाई; १७ जणांवर गुन्हा दाखल

वाळूच्या २६ वाहनांसह ३ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

-बोरी पोलिसांची धडक कारवाई; १७ जणांवर गुन्हा दाखल

 

बोरी(प्रतिनिधी)जिल्हाधिकारी यांच्या परवान्याचे उल्लंघन करत दुधना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या रेतीच्या धक्क्यावर नियोजनबद्ध कारवाई करत पोलीसांनी अवैध खननाला मोठा आळा घातला आहे. पिंपळगाव गायके (ता. जिंतूर) येथील दुधना नदीपात्रात गुरूवारी(दि. ४) सायंकाळी ५ वाजता ही कारवाई करण्यात आली.

पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक जिवन बेनिवाल व त्यांचे पथक बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पीएसआय महादेव गायकवाड आणि इतर पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने राबविण्यात आली. या प्रकरणात फिर्यादी पोलिय हवालदार सिद्धार्थ कोकाटे यांनी तक्रार नोंदविली आहे. कारवाई बोरी पोलीस ठाणे हद्दीत पार पडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी परभणी यांनी उत्खननासाठी दिलेल्या परवान्यातील अटी व शर्तींचे प्राथमिक तपासात उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. अधिकृत पावत्यांशिवाय रेती भरलेल्या वाहनांची वाहतूक, परवान्याच्या मर्यादेपेक्षा जास्त उत्खनन, नदीपात्रात अवैधपणे रेतीचा साठा ठेवणे, पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन, तसेच गौण खनिज अधिनियमाचे नियम मोडून खनन केल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणात १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान २६ वाहने ताब्यात घेण्यात आली. त्यात हायवा, डंपर, ट्रॅक्टर – ट्रॉली, पोकलेन मशीन, चारचाकी वाहने आणी मोटारसायकलींचा समावेश आहे. याशिवाय नदीपात्रात साठवलेली ९० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. वाहनांची व यंत्रसामग्रीची स्वतंत्र किंमत जाहीर करण्यात आली असून संपूर्ण कारवाईतील जप्त मुद्देमालाची एकत्रित रक्कम ३ कोटी ३५ लाख रुपये आहे. या रकमेमध्ये एका चारचाकीत आढळलेली ५ लाख रुपयांची रोख रक्कमदेखील समाविष्ट आहे. या प्रकरणी बोरी पोलिसांत गुन्हे संख्या – ३०६/२०२५ नुसार कलम ३०३(२), ३(५) बीएनएस, तसेच गौण खनिज अधिनियम ४८(७)(८) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ५ व १५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वाळू उत्खननासाठी वापरलेल्या यंत्रसामग्रीची मालकी, वाहतुकीचे जाळे, आर्थिक व्यवहार आणि या अवैध खननात सामील असलेल्या इतर घटकांविषयी सखोल तपास सुरू असून पुढील काही दिवसांत या रॅकेटबाबत आणखी महत्त्वाचे उलगडे होण्याची शक्यता आहे. दुधना नदीपात्रात अवैध उत्खनन दीर्घकाळ सुरू असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने येत होत्या. पर्यावरणाला होणाऱ्या हानीकडे लक्ष देत प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

या कारवाईमुळे अवैध उत्खननात गुंतलेल्या बेकायदेशीर घटकांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे. जिंतूरचे सहाय्यक पोलिस अधिक्षक जीवन बेनिवाल, सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर धोंडगे व या कार्यवाहीत सहभागी असलेल्या पोलिसांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

 

________

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here