पाथरी(प्रतिनिधी)पाथरी तालुक्यात नेहमीच मोठ्या प्रमाणावर गोदावरी पात्रातुन वाळुचा अवैध उपसा व वाहतुक होत असल्याची बातमी सोमवारी १ डीसेंबर रोजी प्रकाशित करण्यात आली होती.सदरील बातमी प्रकाशीत होताच पाथरी तहसिलचे तहसीलदार एस.एन.हन्देश्वर यांनी गुंज येथे एका ट्रॅक्टरवर कारवाई केली.
सविस्तर बातमी अशी की, मंगळवारी २ डिसेंबर रोजी गोदावरी नदी पात्रात दुपारच्या सुमारास ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळुची अवैध वाहतूक चालु असल्याची माहीती मिळाली त्याच माहीतीच्या आधारे मंगळवारी दुपारच्या वेळेस मोटारसायकलवरून जात गुंज नदीपात्रात धडक कारवाई करून अवैध वाळू वाहतूक करणारा जॉनडीअर कंपनीचा हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर पकडला. साप्ताहिक स्मृतिगंध वृत्तपत्रात प्रकाशित बातमीच्या दनक्याने महसुल प्रशासन सक्रिय झाले आणि यशस्वी कारवाई केली. सदरील ट्रॅक्टर सध्या पुढील महसुली कारवाईसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला आहे.
पाथरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा नियमितपणे सुरू असल्याने या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी तहसील प्रशासनाची ठोस कारवाई मागिल महीनाभरात झालेली पहायला मिळाली नाही.परंतु १ डीसेंबर सोमवारी साप्ताहिक स्मृतिगंध वृत्तपत्रांत वाळू उपसा व वाहतूकीविषयी बातमी प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीचे तत्काळ परिणाम दिसून आला.व पाथरी तहसीलचे तहसीलदार एस.एन.हन्देश्वर यांच्या नेतृत्वाखाली एक बहु-विभागीय पथक मंगळवारी गुंज नदीपात्रामध्ये उतरले.यात नायब तहसीलदार सुजलेगावर, मंडळ अधिकारी एम.व्ही.कुलकर्णी (विटेकर),तलाठी नितिन गाडेकर आणि पोलिस कर्मचारी अमोल जैयस्वाल यांचा समावेश होता. निवडुकीच्या कामकाजामुळे सर्व कर्मचारी व्यस्त असल्याचा फायदा घेत वाळु माफीयांचा गोदावरी पात्रात नंगानाच चालु असताना तहसीलदार यांनी एका ट्रॅक्टरवर अचानक कारवाई केल्याने गुंज येथिल वाळु माफीयात भिती पसरली आहे.
नविन नियमानुसार अशी होणार कारवाई
राज्यातील वाळू व इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत कठोर निर्णय घेतले आहेत.अवैध वाहतूक करताना सापडलेल्या वाहनांचे परवाने जागेवरच निलंबित किंवा रद्द करण्यात येणार आहेत. पहिल्यांदा पकडल्यास ३० दिवस परवाना निलंबित ठेवून वाहन अडकवले जाईल, दुसऱ्यांदा ६० दिवस निलंबन लागू होईल, आणि तिसऱ्यांदा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल.