Home गुन्हेगारी अजब… ऐकावं ते नवलच; ५० ब्रास मुरूम उत्खनन व वाहतुकीसाठी ३ दिवसांची परवानगी तलाठी अहवालावरून ५० ब्रास मुरूम परवानगी विवादित;तहसील कर्मचाऱ्यांची भूमिका तपासण्याची गरज सदरील मुरम उत्खनन वाहतुकीमध्ये तहसील कर्मचाऱ्यांची भागीदारी असल्याची जोरदार चर्चा

अजब… ऐकावं ते नवलच; ५० ब्रास मुरूम उत्खनन व वाहतुकीसाठी ३ दिवसांची परवानगी तलाठी अहवालावरून ५० ब्रास मुरूम परवानगी विवादित;तहसील कर्मचाऱ्यांची भूमिका तपासण्याची गरज सदरील मुरम उत्खनन वाहतुकीमध्ये तहसील कर्मचाऱ्यांची भागीदारी असल्याची जोरदार चर्चा

अजब… ऐकावं ते नवलच; ५० ब्रास मुरूम उत्खनन व वाहतुकीसाठी ३ दिवसांची परवानगी     तलाठी अहवालावरून ५० ब्रास मुरूम परवानगी विवादित;तहसील कर्मचाऱ्यांची भूमिका तपासण्याची गरज     सदरील मुरम उत्खनन वाहतुकीमध्ये तहसील कर्मचाऱ्यांची भागीदारी असल्याची जोरदार चर्चा

अजब… ऐकावं ते नवलच; ५० ब्रास मुरूम उत्खनन व वाहतुकीसाठी ३ दिवसांची परवानगी

 

तलाठी अहवालावरून ५० ब्रास मुरूम परवानगी विवादित;तहसील कर्मचाऱ्यांची भूमिका तपासण्याची गरज

 

सदरील मुरम उत्खनन वाहतुकीमध्ये तहसील कर्मचाऱ्यांची भागीदारी असल्याची जोरदार चर्चा

 

पाथरी(प्रतीनीधी)पाथरी तालुक्यातील तुरा शिवारात दिनांक २० नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान ५० ब्रास मुरूम उत्खनन व वाहतुकीसाठी दिलेली परवानगी वादग्रस्त ठरली आहे. येथे दिलेली परवानगी आणि तलाठी यांनी तयार केलेला अहवाल व पंचनामा चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

 

तलाठी यांच्या अहवालानुसार, या शिवारातील १०५ नंबर गट क्रमांकात एक विहीर असून त्या विहिरीवर मुरूम उपलब्ध असल्याचे नमूद आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या शेतात विहीरच नाही, उलट बाजूला असलेल्या वेगवेगळ्या विहिरीवर मुरूमाची एक टोपली देखील मुरुम उपलब्ध नाही. यावरून तलाठी यांनी केलेला अहवाल चुकीचा असल्याचे स्पष्ट होते.

 

त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे तलाठी यांनी जाय मोक्यावर न जाऊन, तहसील कार्यालयात बसून अर्जदारांनी दाखवलेले फोटो पाहूनच पंचनामा तयार केला आहे. या पंचनाम्यावर पाथरी येथील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून, जर जाय मोक्यावर जाऊन पंचनामा झाला असता तर त्या पंचनाम्यात गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असाव्यात हे तीतकेच खरं आहे.

 

याशिवाय, त्या ठिकाणावर पाच ते सहा हायवा आणि दोन टिपरच्या साहाय्याने अंदाजे हायवा मध्ये पाच ब्रास आणी टीप्पर मध्ये अंदाजे अडीच-तीन ब्रास मुरूमाची वाहतूक होते.तर एक हायवा दीवसभरात कीमान पाच-सहा ट्रीपची वाहतूक करतो म्हणजे एक हायवा दीवस भरात २५ ब्रास मुरुमाची वाहतुक करतो. त्यामुळे ५० ब्रास मुरूम उत्खनन व वाहतुकीसाठी तीन दिवसांची परवानगी देणे का गरजेचे होते, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी होईल की नाही, यासाठी नागरिक उत्सुक आहेत.

 

या साऱ्या प्रकारांमध्ये तहसील कर्मचाऱ्यांच्या सहभागाची/भागिदारी असल्याची शंका समोर येत असून, सर्व संबंधितांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य तो कारवाई करणे आवश्यक आहे, असा दबाव नागरिकांमध्ये जाणवत आहे

 

उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांनी दिले चौकशीचे आदेश

तुरा शिवारामध्ये दिनांक २० नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान देण्यात आलेल्या मुरूम उत्खनन वाहतुकी संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता व सदरील प्रकरणात पत्रव्यवहार केला असता त्यांनी तहसीलदार एस.एन.हन्देश्वर यांना एका पत्राद्वारे सदरील प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश २१ नोव्हेंबर रोजी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here