Home सामाजिक योगेश्वरी शुगर्सच्या ऊस वाहतुक वाहनांना बसविले रिफ्लेक्टर; पोलीस अधिक्षक कार्यालय, योगेश्वरी शुगर्स चा उपक्रम.

योगेश्वरी शुगर्सच्या ऊस वाहतुक वाहनांना बसविले रिफ्लेक्टर; पोलीस अधिक्षक कार्यालय, योगेश्वरी शुगर्स चा उपक्रम.

योगेश्वरी शुगर्सच्या ऊस वाहतुक वाहनांना बसविले रिफ्लेक्टर;  पोलीस अधिक्षक कार्यालय, योगेश्वरी शुगर्स चा उपक्रम.

योगेश्वरी शुगर्सच्या ऊस वाहतुक वाहनांना बसविले रिफ्लेक्टर;

पोलीस अधिक्षक कार्यालय, योगेश्वरी शुगर्स चा उपक्रम.

 

पाथरी( प्रतिनिधी)-पाथरी ता.पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी व योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा.लि. लिंबा यांच्या संयुक्त विद्यमाने कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अॅड रोहित भैय्या देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज (दि.२०गुरुवार) रोजी कारखाना साइटवर रस्ते अपघात टाळण्या साठी सर्व ट्रक,ट्रॅक्टर या वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्यात आले.

वाहन चालक यांच्या करिता पोलीस अधिक्षक कार्यालय आणि योगेश्वरी शुगर्स लक्ष्मी नगर लिंबा यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते अपघात जनजागृती मोहीम कार्यक्रम हाती घेण्यात आला . त्यामध्ये अपघात होऊ नये म्हणून मार्गदर्शन करण्यात आले. ड्रायव्हर यांनी वाहन चालविताना नशा पाणी करू नये, वाहनांना रेडियम व रिफ्लेक्टर बसवावे तसेच रोडवर वाहने उभे करू नयेत, साईडला उभे करावीत अशा सूचना शहर वाहतूक शाखा परभणी व पोलीस स्टेशन पाथरी यांच्यामार्फत देण्यात आल्या.

पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, शहर वाहतूक शाखा परभणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वामनराव बेले, शहर वाहतूक शाखा परभणीचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे यांनी रस्ते अपघाताबाबत मार्गदर्शन केले. या वेळी ट्रक ट्रॅक्टर ला रिफ्लेक्टर बसविले त्यावेळी कारखान्याचे डेप्युटी जनरल मॅनेजर राजकुमार तौर, बुलढाणा अर्बन बँक परभणीचे विभागीय व्यवस्थापक निशांत कोचर, कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी तुकाराम झाडे, सुरक्षा अधिकारी गणेश वाघमारे, केनयार्ड सुपरवायझर गुलाब पवार, स्वराज इंटरप्राईजेस अँड रिफ्लेक्टर सप्लायर चे सुरेश गिराम ,ऊसतोड वाहतूक ठेकेदार तसेच सर्व ट्रॅक्टर व ट्रक चालक, मालक यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here