परभणी(प्रतिनिधी)जिल्हयातील गंगाखेड आणि पूर्णा पोलिस ठाणे हद्दीतील सहा सराईत गुन्हेगारांना होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधिक्षकांनी शुक्रवारी (दि.21) हद्दपारीचे आदेश जारी केले.
पोलिस ठाणे हद्दीत गुंड प्रवृत्ती, जीवीतास आणि मालमत्तेस धोका निर्माण करणार्या कृती करणे, धुखापत पोहचवणे, खूनाचा प्रयत्न करणे, जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्रांनीशी गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, मारहाण करणे तसेच जबर दुखापत करणे आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गंगाखेड पोलिस ठाणे हद्दीतील राजीव दत्ता दराडे रा.कृष्णनगर, गंगाखेड, बालासाहेब दत्तराव लांडे रा.वझुर ता.पूर्णा, शिवाजी सर्जेराव गादेकर रा.अकोली ता.गंगाखेड, गोविंद दिलीप अंधळे रा.झोला ता.गंगाखेड, सचिन रमेशराव जोगदंड रा.देवठाणा ता.पूर्णा यांच्या विरूध्द पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने उपविभागीय दंडाधिकारी गंगाखेड यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तसेच पूर्णा पोलिस ठाणे हद्दीतील प्रताप अच्यूराव कदम रा.कदम गल्ली पूर्णा याच्या विरूध्द पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने उपविभागीय दंडाधिकारी गंगाखेड यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या सर्व प्रकरणात उपविभागीय दंडाधिकारी गंगाखेड यांनी अंतिम चौकशी करून सराईत गुन्हेगाराविरूध्द परभणी जिल्हयातून एक वर्ष कालावधीसाठी हद्दपारीचे आदेश पारीत केले.
जिल्हयाच्या सार्वजनिक शांततेस धोका निर्माण करणार्या, सामान्य जनतेस वेठीस धरणार्या, अवैध धंदे करणार्या प्रशासनास वेठीस धरणार्या गंड प्रवृत्तीचे समुळ उच्चाटन केले जाणार असून अशा प्रवृत्तींचे नाश करण्यासाठी कायदेशिर आणि सनदशिल मार्गाचा अवलंब करावा.
-रविंद्रसिंह परदेशी
पोलिस अधिक्षक, परभणी
__________