Home Uncategorized मी तुमच्या कामाचा. रानबा गायकवाड यांनी सध्या चालु असलेल्या निवडणूक काळातील परिस्थितीवर लीहलेली एक अप्रतिम शब्दरचना

मी तुमच्या कामाचा. रानबा गायकवाड यांनी सध्या चालु असलेल्या निवडणूक काळातील परिस्थितीवर लीहलेली एक अप्रतिम शब्दरचना

मी तुमच्या कामाचा.     रानबा गायकवाड यांनी सध्या चालु असलेल्या निवडणूक काळातील परिस्थितीवर लीहलेली एक अप्रतिम शब्दरचना

मीच तुमच्या कामाचा

 

लागताच निवडणूक

तो लागला कामाला

फिरकला न कधी गल्लीत

आता चकरा माराय लागला

 

मीच तुमच्या कामाचा

बाकी सारे बिनकामाचे

एकच सांगाय लागला

चहा पाणी पाजाय लागला

 

नव्हता बघत कधी कुणाकडे

कंबरेतुन वाकाय लागला

मागणी त्याची प्रत्येकापुढे

द्या आशिर्वाद या पामराला

 

निवडून जाऊ द्या एकदा

बघा कसा करतो काम

पैशाच्या जीवावर गर्दा

घोषणांनी परिसर जाम

 

माहित असतं त्यालाही

आपण केलेलं नसतं काम

विजयासाठी मग वाटत सुटतो

वारेमाप मतदारांना दाम

रानबा गायकवाड

7020766674

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here