Home राजकीय मानवत न. प. उपनगराध्यक्षपदी डॉ. अंकुश लाड बिनविरोध  -प्रकाश पोरवाल, ॲड. अनिरुद्ध पांडे स्वीकृत सदस्य

मानवत न. प. उपनगराध्यक्षपदी डॉ. अंकुश लाड बिनविरोध  -प्रकाश पोरवाल, ॲड. अनिरुद्ध पांडे स्वीकृत सदस्य

मानवत न. प. उपनगराध्यक्षपदी डॉ. अंकुश लाड बिनविरोध      -प्रकाश पोरवाल, ॲड. अनिरुद्ध पांडे स्वीकृत सदस्य

मानवत(प्रतिनिधी)येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी डॉ. अंकुश लाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर स्विकृत सदस्य म्हणून प्रकाश पोरवाल आणि ॲड. अनिरुद्ध पांडे यांच्या नावांना अधिकृत मान्यता देण्यात आली. दुपारी १.३० वाजता नगराध्यक्ष तथा पीठासन अधिकारी राणी अंकुश लाड यांच्या अध्यक्षतेखाली सभेस सुरुवात झाली. यावेळी मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी त्यांना सहकार्य केले.

उपनगराध्यक्षपदासाठी डॉ. अंकुश लाड यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे पीठासन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. स्विकृत सदस्यपदासाठी प्रकाश पोरवाल, ॲड. अनिरुद्ध पांडे आणि चिंचोड अन्सारी मतीन तखी असे तीन अर्ज दाखल झाले. मात्र नगरपालिकेतील राजकीय संख्याबळ लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश पोरवाल व ॲड. अनिरुद्ध पांडे यांच्या निवडीवर नगराध्यक्ष राणी अंकुश लाड यांनी अधिकृत शिक्कामोर्तब केले.

याप्रसंगी बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, उपसभापती नारायण भिसे, नगरपालिकेचे अभियंता शेख अन्वर यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये राजकुमार खरात, नियमत खान पठाण, संजय बागड, किशोर लाड, अनुराधा राजेश वासुंबे, ज्योती विष्णू आळसपुरे, नंदिनी गणेश मोरे, द्वारका दत्ता चौधरी, वृषाली विनोद रहाटे, मीरा मोहन लाड, रेखा बाजीराव हलनोर, भाग्यश्री स्वप्निल शिंदे, सुशीला बालाजी लाड, रूपाली गणेश उगले, डॉ. देवयानी राजेश दहे तसेच उबाठा गटनेते दीपक बारहाते यांचा समावेश होता. याशिवाय ॲड. विक्रमसिंह दहे, शैलेंद्र कत्रुवार, मो. बिलाल मो. युनूस बागवान, शेख जावेरिया बेगम, विभा भदर्गे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित व्यापारी, ज्येष्ठ नागरिक व अधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here