महापालिका निवडणूक : आज प्रभाग समिती �ब� कार्यालयातून नामनिर्देशन पत्र वितरण करण्यात येणार
परभणी,दि.22(प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवार 23 डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्रांचे वितरण प्रभाग समिती �ब� कार्यालयातून संपूर्ण शहरासाठी एकाच ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
महानगरपालिका निवडणुकीसाठी 23 ते 30 डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी करण्यात येणार असून, पात्र व अपात्र उमेदवारांची यादी त्याच दिवशी जाहीर केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 2 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत असणार आहे. त्यानंतर 3 जानेवारी रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून, अंतिमरीत्या निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादीही त्याच दिवशी प्रसिद्ध केली जाणार आहे.
निवडणुकीसाठी मतदान 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडणार आहे. तर मतमोजणी 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार 23 डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्रांचे वितरण प्रभाग समिती �ब� कार्यालयातून संपूर्ण शहरासाठी एकाच ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.