सुनेत्रा अजित पवार या नावाच्या मध्ये अजित नावाची ताकद आहे ती सहजासहजी मिळालेली नाही. त्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या पतीचे म्हणजे अजित पवार यांचे योगदान मोठे आहे.उभ्या महाराष्ट्राला शोकसागरात ठेवून अजित पवार मृत्यूनंतरही अजित आहेत, हे कळत .कारण, त्यांच्या जाण्याची जाणीव आजही स्वप्नवत वाटते. मृत्यूसुध्दा कर्तव्यात आला.भल्या पहाटे उठणारा लोकप्रतिनिधी सर्वांना आपोआप कामाला लावावं लागतं असेल. कुठलाही राज्याचा प्रमुख व्यक्तीसाठी काही खास शासकीय यंत्रणा असते.ही सगळी यंत्रणा अजित पवार कधी काय काम काढतील याची शाश्वती नसल्याने सतर्क असायची. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येत तेव्हा तेव्हा अधिकार्यांची भंबेरी उडत. किंबहुना त्यांना सतर्क राहावे लागत असे.एक उत्तम प्रशासक असलेल्या अजित पवार यांच्या पत्नी सुध्दा शिस्तबद्ध पद्धतीने राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील यात तिळमात्र शंका नाही. सुनेत्रा पवार पवार या राजकारणात नवख्या वाटत असल्या तरी त्यांनी अजित पवार यांची कार्यशैली पत्नी म्हणून सुनेत्रा पवार यांनी पाहिली आहे. त्यामुळे त्यांच्यात अजित पवार यांच्या वक्तशीरपणा शिस्त आणि कर्तव्यकठोरपणा त्यांच्यात असणारच यात दूमत नाही. सुनेत्रा पवार या भारतीय राजकारणातील आहेत. त्यांच्या घरातच देशाच आणि राज्याच राजकारण शिजत म्हटलं तर योग्य. त्यामुळे राजकारण हा शब्द सुनेत्रा पवार यांना नवखा नाही. डोंगराएवढ दूख उराशी बाळगून त्या पुढे आल्या आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. याबाबत अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिली.मात्र, अजित पवार यांना खरी श्रद्धांजली यापेक्षा वेगळी काय असू शकते.पती गेल्याच दू:ख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुटुंबप्रमुख गेल्याच दुःख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कुटुंबातील सदस्यांना नसेल काय? अख्खा महाराष्ट्र अजित पवार यांच्या जाण्याने हळहळतोय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुटुंब प्रमुख गेल्याचं दुःख कुटुंबाला किती असेल?त्यांनी कुटुंबाला छाया दिली कार्यकर्त्यांना उभं केलंय.पण, राज्याच्या विकासासाठी दू:ख उराशी बाळगून सुनेत्रा पवार पुढे आल्या खर तर त्यांना हीच श्रद्धांजली आहे.राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठसा उमटवतील यात दूमत नाही.कारण,त्या अजित पवार यांच्या पत्नी आहेत.
हे विसरून चालणार नाही.त्या या पदावर असलेल्या पहिल्या महिला आहेत. यापूर्वी, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्या म्हणून महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सदस्या होत्या. बारामती टेक्सटाईल कंपनीच्या अध्यक्षा आणि एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या सीईओ आहेत. २०२४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत बारामती येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार होत्या मात्र, त्यांचा पराभव झाला.त्यांच्या नणंद सुप्रिया सुळे यांच्याकडून १.५८ लाख मतांनी पराभूत झाल्या.हा जिव्हारी लागणारा पराभव आणि बहिणीचा विजय यात अजित पवार कधी गंभीर झाले नाहीत.राजकारण ते त्याच वेळी संपवत आणि कामाला सुरुवात करत असतं.आज त्यांची सहचारिणी राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री झालीय. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या मराठवाड्यातील आहेत . त्यामुळे अजित पवार मराठवाड्याचे जावई . सुनेत्रा यांचा जन्म उस्मानाबाद येथील तेर येथे बाजीराव पाटील यांच्या पोटी झाला. त्या माजी राज्यमंत्री आणि लोकसभा खासदार पद्मसिंह पाटील यांच्या बहिणी आहेत.राजकारणातील मोठं प्रस्थ पद्मसिंह पाटील यांच्याभोवती होतं.२०१० मध्ये, सुनेत्रा यांनी पर्यावरणीय मंच ऑफ इंडियाची स्थापना केली, जी सेंद्रिय शेती, इको-व्हिलेजेस आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित एक स्वयंसेवी संस्था आहे. पर्यावरण जागरूकता पसरवण्यासाठी आणि शाश्वत पद्धती लागू करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांना “ग्रीन वॉरियर अवॉर्ड” आणि इतर प्रशंसा मिळाली आहे. २०११ पासून त्या फ्रान्समधील जागतिक उद्योजकता मंचाच्या थिंक टँक सदस्य आहेत, शाश्वत विकास आणि उद्योजकतेवरील जागतिक चर्चांमध्ये योगदान देतात. सुनेत्रा पवार या शरद पवार यांनी स्थापन केलेल्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्त म्हणून देखील काम करतात. त्या नियमितपणे तिच्या उपक्रमांवर देखरेख करतात, २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची तरतूद सुनिश्चित करतात. शिक्षणातील त्यांचा सहभाग २०१७ पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून त्यानी काम पाहिले आहे. महिलांना संधी मिळायला हवी . तीचं सोनं केल्याशिवाय त्या राहत नाहीत हा आजवरचा इतिहास सांगतो.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पक्षाची आणि मुख्यमंत्री पदाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळत आहेत. बहुजन समाज पक्षाला उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती सांभाळत आहेत. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी याच्या निधनानंतर सोनिया गांधी यांनी पक्ष सांभाळला.अशी अनेक उदाहरणे देता येतील. महिलांनी फक्त घर सांभाळावे तिला जमेल का? दुसऱ्याच्या हातचं बाहूल होतील असे प्रश्न करण्यापेक्षा महिलांना संधी किती दिली जाते?याचा विचार मात्र आपण कधी केला आहे का? सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्या जाण्याने त्यांना पक्षाची आणि उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळावी लागते. मात्र, अजित पवार यांच्या कामाचा झपाटा विलक्षण होता ते सुनेत्रा पवार यांनी जवळून पाहिला आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आणि पक्षाच्या सर्वेसर्वा म्हणून आदर्श निर्माण करतील यात संदेह नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आपल्या कार्यातून अजित पवारांना स्वर्गीय नव्हे तर अजित ठेवतील. अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
– पदमाकर उखळीकर ,
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)
मो.९९७५१८८९१२.
kalpadmakarukhlikar@gmail.com