पाथरी(प्रतिनिधी) जिल्ह्यात अवैध रेती (वाळूचे) उत्खननावर लगाम घालण्यासाठी महसूल विभागाने जिल्हाभरात धडाकेबाज कारवाई करायला सुरू केल्या असून पाथरी तालुक्यातील मौजे गौडगाव येथे छापा टाकण्यात आला परंतु त्या ठिकाणी पथक जाण्यापूर्वीच चालू असलेले तराफे गोदावरी नदीपात्रातून वाळू माफियांकडून गायब करण्यात आले. परंतु पथकाला अवैधरित्या उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणारी जुनी सामग्री सापडली ती सामग्री मात्र पथकाकडून नष्ट करण्यात आली.
सविस्तर बातमी अशी की, जिल्ह्यात गोदावरी नदी पात्रामधून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूचे उत्खनन चालू असल्याने जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पथके तयार केले आहेत
.या पथकामार्फत जिल्हाभरातील गोदावरी नदीपात्रामध्ये ठिकठिकाणी छापे मारून सदरील ठिकाणी अवैध वाळू उत्खननासाठी सापडलेली सामग्री त्याच ठिकाणी नष्ट करण्यात येत आहे.
याचाच एक भाग म्हणून काल दिनांक ८ डिसेंबर रोजी दुपारी पाथरीच्या उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण व तहसीलदार शंकर हंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार धोपे, मंडळ अधिकारी बागुल,तलाठी साजिद, तलाठी तायनाक, तलाठी गाडेकर, कोतवाल चव्हाण यांच्या पथकाने गौडगाव येथे कारवाई करण्यासाठी गुंज येथे जाऊन गोदावरी नदी पात्रातील एका बोटीच्या सहाय्याने गौडगाव गाठले परंतु त्या ठिकाणी चालू असलेले तराफे वाळूमाफियांकडून सकाळीच गायब करण्यात आल्याने सदरील ठिकाणी पथकाच्या हाती वाळू माफियांची जुनी सामग्री सापडली यावरच पथकाला समाधान मानावे लागले ती सामग्री लागलीच पथकाने नष्ट केली.
महसूल मध्येच वाळू माफियांचा खबरी
गौडगाव येथील गोदावरी पात्रामध्ये सहा ते सात तराफ्याच्या साह्याने दिवसभर वाळू उपसा करण्यात येतो.एका तराफ्यावर आठ ते दहा परराज्यातील मजुराच्या सहाय्याने किमान एक ब्रास वाळू एका वेळेस काढण्यात येते. सदरील तराफ्यांना लोखंडे अँगल,दोरखंड व हिरव्या रंगाची नेट लावलेली असते परंतु या ठिकाणी कारवाईसाठी निघालेल्या पथकाची खबर महसूल मधील खबऱ्याने गौडगाव येथील वाळू माफीयांना अगोदरच दिल्याने गोदावरी नदी पात्रामध्ये चालू असलेली नवीन तराफे हे गोदावरी पात्रातून हटवण्यात आले या ठिकाणी पथक गेल्यावर त्यांना त्या ठिकाणी काही जुनी सामग्री आढळून आली.याच सामग्रीवर सदरील पथकाने समाधान मानून सदरील सामग्री नष्ट केली. परंतु महसूल मधील तो खबरी कर्मचारी कोण?याचा तपास वरिष्ठ अधिकारी करणार का? आणि त्या खबऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठली कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे आहेत ७ डिसेंबर रविवारी घेण्यात आलेल्या तरफ्यांची फोटो



ही आहेत ८ डिसेंबर सोमवारी पथकाने केलेल्या कारवाईतील तराफ्यांचे फोटो
