Home देश-विदेश काँग्रेस पक्षातच अखेरचा श्वास घेतला! 

काँग्रेस पक्षातच अखेरचा श्वास घेतला! 

काँग्रेस पक्षातच अखेरचा श्वास घेतला! 

 

काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांच ५ जानेवारी २०२६ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी दू:खद निधन झाले.सुरेश कलमाडी आणि पुणे हे नाव जवळजवळ देशभरात पण त्याहूनही ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिल्या फळीतील महाराष्ट्रातील नेते म्हणून त्यांची ओळख होती. सुरेश कलमाडी २०१४ पर्यंत पुण्यातून संसद सदस्य होते . भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष आणि २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे अध्यक्ष असताना २०१० साली भारतात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते.२०१० साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आयोजनात भ्रष्टाचार झाल्याचे विरोधकांनी आरोप केले आणि त्या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप झाला आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार त्यांच्यावर कट रचणे, बनावटगिरी, गैरवर्तनाचा आरोप ठेवण्यात आला होता आणि नंतर एप्रिल २०१४ मध्ये त्यांना अटक करण्यात आली , परंतु अद्याप त्यांच्यावर खटला चालवण्यात आला नव्हता.नंतर त्यांची दोषमुक्त सुटका झाली. यावरून राजकारण केले गेले की काय?हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

काँग्रेसने सुरेश कलमाडी यांना अनेक राजकीय पदं दिली. खरं तर काँग्रेस कार्यकर्त्याचा नेता बनवते.१९७७ मध्ये, कलमाडी पुणे भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि पुढे त्यांनी महाराष्ट्रातील युवा काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले, हे पद त्यांनी १९७८ ते १९८० पर्यंत भूषवले. म्हणजे १९७७ ला पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते पुढच्या वर्षी म्हणजे १९७८ ला महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष.हा त्यांच्यातील नेतृत्वगुण म्हणता येईल.१९८० मध्ये, महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून, कलमाडी यांनी मॉस्को ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मॅरेथॉन संघाच्या निवड चाचण्या घेतल्या. यामुळे लवकरच पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची स्थापना झाली.पुण्याला राजकीय आणि सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात सुरेश कलमाडी यांचा मोठा वाटा आहे.कलमाडी यांची राजकीय कारकीर्द मोठी राहिली आहे. १९८१-१९८६ पर्यंत भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले .ते १९८२ ते १९९६ आणि पुन्हा १९९८ मध्ये तीन वेळा राज्यसभेचे सदस्य होते . कलमाडी यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले आणि १९८९ मध्ये पुणे महोत्सव सुरू केला. १९९६ मध्ये ते ११ व्या लोकसभेवर आणि २००४ मध्ये १४ व्या लोकसभेवर निवडून आले. पी.व्ही. नरसिंह राव यांच्या प्रधानमंत्रीपदाच्या कार्यकाळात , सुरेश कलमाडी यांनी १९९५ ते १९९६ पर्यंत रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्याच वर्षी त्यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस पक्षाचा विश्वासू चेहरा म्हणून सुरेश कलमाडी महाराष्ट्र आणि भारतभर ओळखले जात होते.क्रिडा क्षेत्रातही त्यांनी खूप काम केले आहे.१९९६ ते २०१२ पर्यंत भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी २००० ते २०१३ पर्यंत आशियाई अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आणि २०१५ मध्ये त्यांना त्याचे आजीवन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. अशा अनेक महत्त्वाच्या घटनात्मक पदावर त्यांनी काम केले.त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात भारताला क्रीडा क्षेत्रात विशेष ओळख निर्माण झाली होती. कलमाडी यांनी २००७ मध्ये भारतीय ऑलिंपिक असोसिएशन म्हणून फॉर्म्युला वन ग्रांप्री भारतात आणण्यासाठी करार केला. त्याच वर्षी नंतर, यूके-स्थित आयोजक फॉर्म्युला वन अॅडमिनिस्ट्रेशन लिमिटेडने भारत-स्थित जेपीएसके स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत या संदर्भात १६ अब्ज डॉलर्सचा (२०२३ मध्ये ४८ अब्ज डॉलर्स किंवा ५७० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या समतुल्य ) करार केला. त्यांच क्रिडा क्षेत्रात भारताला वेगळ्या उंचीवर नेले हे कोणीही मान्य करेल.

सुरेश कलमाडी यांना कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याप्रकरणी अटक झाली होती आणि त्यांनी सुमारे १० महिने तुरुंगवास भोगला, परंतु नंतर त्यांना जामीन मिळाला आणि त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत; त्यामुळे त्यांना कोणतीही मोठी शिक्षा झाली नाही, उलट २०२५ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना क्लोजर रिपोर्ट देऊन दोषमुक्त केले. मात्र त्यांना झालेल्या तुरुंगवासाच्या शिक्षेची जबाबदारी आता कोण घेईल. काँग्रेसला यांचा परिणाम झाला पक्षाच्या प्रतिमा नाहक मलिन करणाऱ्यांना आता कोणती शिक्षा द्यावी? ज्याचा परिणाम केवळ काँग्रेस नाही तर अख्खा देश भोगतो आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि शेवटी त्याचे काय झाले हे उघडउघड आहे पण, ज्यांना भ्रष्टाचाराची नाहक राळ उठवून सत्तांतर घडवून आणावयाचे होते ते मात्र घडले पण, सुरेश कलमाडी यांच्यासारख्या ज्यांची महाराष्ट्रभर काँग्रेसी म्हणून ख्याती होती. ती त्यांना तुरुंगात पाठवण्यात आल्याने काँग्रेस हतबल होत गेली. तीच हतबलता काँग्रेसच्या विद्यमान नेत्यांवर आल्यामुळे काँग्रेसने उभे केलेले नेतृत्व आजघडीला सत्ताधारी पक्षात जातांना आपण बघतो आहोत. असो, पण माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांनी पक्षाशी एकनिष्ठता सोडली नाही आणि अखेरचा श्वास काँग्रेस पक्षातच घेतला!

 

– पदमाकर उखळीकर ,

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

मो.९९७५१८८९१२.

kalpadmakarukhlikar@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here