कलेक्टर आणी एसपी साहेब पाथरीत चालु आहे तरी काय?;अवैध धंदे जोरात सुरू आहेत;अवैध धंद्यावर कोणाचा वरदहस्त
पाथरी(प्रतिनिधी) पाथरी तालुक्यामध्ये गुन्हेगारी अवैध वाळू,अवैध इत्यादी गौण खनिज चोरी,गुटखा,बिंगो नावाचा मटका,जुगार व गुंडगिरीला चालना मिळणारे अनेक अवैध धंदे पाथरी मध्ये सुरू असताना याकडे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब व पोलीस अधीक्षकांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे असून पाथरी शहरामध्ये चालू असलेले अवैध धंदे यावर कायमस्वरूपी बंदी येणार का असा प्रश्न जनसामान्यातून विचारला जात आहे.
शहरामध्ये राहणाऱ्या मोठ्या गुटखा माफियांवर पाथरी पोलिसांकडून कधी होईल ठोस कारवाई
पाथरीमध्ये अवघ्या ठाण्याच्या आवारा पासूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रत्येक पान टपऱ्या प्रत्येक किराणा दुकान चहाच्या हॉटेल्स इत्यादी ठिकाणी व बस स्टँड परिसर,शेलु कॉर्नर, पोखर्णी फाटा,सोनपेठ फाटा,सेलू फाटा इत्यादी ठिकाणी असलेल्या पान टपरी असतील चहाच्या हॉटेल्स असतील या ठिकाणी विविध प्रकारचे गुटके त्यामध्ये मावा असेल बाबारत्ना असेल किंवा नवीन नवीन मार्केटला वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा पाथरी शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होत असताना पाथरी पोलीस याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करते की काय यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.या सर्व प्रकाराकडे पाथरी पोलीस प्रशासनाचे तर दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे परंतु त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने पाथरी तालुक्यामध्ये अशी ठोस कारवाई झाल्याचे अध्यापही ऐकावयास मिळत नाही.पाथरी शहरासह ग्रामीण भागामध्ये हा गुटखा पोहोचवणारे गुटखा माफिया मात्र खुलेआम ग्रामीण भाग व शहरांमध्ये गुटखा पोहोचवत असून या गुटखा माफियांवर पाथरी पोलिसांकडून कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाथरी तालुक्यामध्ये अवैध वाळू उपसा व वाहतूक चालू महसूल प्रशासनाकडून मात्र कुठलीही कारवाई नाही
पाथरी तालुक्यातील मौजे गुंज गोंडगाव,उमरा येथून मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर केणीच्या साह्याने दिवस-रात्र वाळू उपसा सुरू असताना महसूल प्रशासनातील तलाठी मंडळ अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून कुठलीही कारवाई का करण्यात येत नाही ही चर्चा जनसामान्यांमध्ये रंगू लागली आहे याकडे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष देऊन पाथरी तालुक्यात चालू असलेला अवैध वाळू उपसा बंद करतील का अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

गुंज खुर्द येथे रात्रीच्यावेळी 20-25 ट्रॅक्टरच्या सहाय्याने रात्री वाळू उपसा सुरु

पाथरी तालुक्यामध्ये गोदावरी नदीचे पात्र मोठे असून त्यामध्ये नाथरा ते मुदगल पर्यंत असं गोदावरीचा पात्र आहे.परंतु मागील काही काळामध्ये काही अधिकारी व पोलिसांच्या संगणमताने पाथरी तालुक्यामध्ये अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर चालू आहे मधल्या काळात गोदावरी नदीला पाणी आल्याने काही काळ गोदावरी नदीमधील अवैध वाळू उपसा बंद होता परंतु मागील आठ ते दहा दिवसापासून गुंज खुर्द येथील नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने गुंज खुर्द येथे रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत 20 ते 25 ट्रॅक्टरने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे.यामध्ये गावचे ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा इतर गाव गाडा चालवणाऱ्यांचे नातेवाईकच असल्याचे बोलले जात आहे.ग्रामपंचायत गुंजखुर्द येथील ग्रामपंचायतीवर ठोस कारवाई करण्याची गरज असून जेणेकरून या ठिकाणी चालू असलेला अवैध वाळू उपसा बंद होईल.
तालुक्यातील अवैध दारू विक्री कधी होणार बंद
पाथरी तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणामध्ये होत असून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये अवैधरित्या देशी दारू असेल यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. तालुक्यातील मौजे गुंज,बाभळगाव,रामपुरी, ढालेगाव,रेणाखळी,हादगाव,वाघाळा कासापुरी,नाथरा लोणी इत्यादी ठिकाणी मोठ्याप्रमाणावर याकडे पोलिसांबरोबरच औषध व अन्न प्रशासनाकडून देखील दुर्लक्ष केले जात आहे
विकास कामाच्या नावाखाली इच्छुकांकडून अवैध गौणखणीजाची चोरी
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भावी जिल्हा परिषद सदस्य भावी पंचायत समिती सदस्य इत्यादींकडून ग्रामीण भागामध्ये विकास कामाच्या नावाखाली कुठलीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज(मुरुम)उत्खनन मोठ्या करून गाव शिवारातील रस्ते इच्छुकांकडून करण्यात येत असून या विकास कामाच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडणुकीत गावकऱ्यांकडून भरघोस मतदान मिळेल या आशेने अवैध गौण खनिजाची चोरी करून विकास कामे करण्यात येत असल्याचे सध्या पहावयास मिळत आहे.
शहरामध्ये विंगो नावाच्या मटक्याने घातला धुमाकूळ;लाखो रुपयाची उलाढालश
शहरामध्ये सध्या चर्चेमध्ये असलेला विषय म्हणजे विंगो नावाचा मटका या जुगारामध्ये दहा रुपयाला शंभर रुपये असे काही मिनिटातच मिळत असल्याने या विंगो नावाच्या मटक्याकडे शहरासह ग्रामीण भागातील अनेक तरुण वळाले असून या जुगारापायी अनेक युवकांचे व नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असून जो पैसा त्यांच्या संसारात वापरायचा आहे तो पैसा या विंगो नावाच्या मटक्यात घालून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर दिसून येत आहेत. या मटक्या पायी अनेक तरुण व नागरिक हे चुकीच्या मार्गाला लागली आहेत.त्यामुळे चोऱ्या आणि गुंड प्रवृत्ती सध्याच्या तरुण आणि युवक वर्गामध्ये पहावयास मिळत आहे.
शहरातील वाहतुकीला कधी लागणारे शिस्त

शहरांमधून जात असलेला राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले असून शहरांमध्ये चालणारे तीन चाकी ऑटो, मोटरसायकल,जड वाहने मोठ्या प्रमाणावर बेसिस्तपणे चालवताना दिसून येत आहेत. यामध्ये शहरातील सेलू कॉर्नर बस स्थानकासमोरील मुख्य रस्ता व चक्क पोलीस स्टेशन समोर असलेल्या चौकामध्ये देखील बेसावधपणे वाहन चालवणारे वाहन चालक दिसून येत आहेत यामुळे शहरांमध्ये नेहमीच छोटे-मोठे अपघात होत असतात याकडे मात्र पाथरी पोलिसांचे लक्ष असल्याचे दिसून येत आहे यावर पाथरी पोलीस काय बंदोबस्त करणार याकडे जनसामान्याचे लक्ष लागला आहे.