अस्मिता आणि आत्मसन्मान निर्माण करणारा विजय !
धुरंधर;सौ. अर्चना रोडे
पदमाकर उखळीकर
परळी नगरपरिषद निवडणूक अटीतटीची झाली होती. यामध्ये अनेकांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्यात प्रामुख्याने काटे की टक्कर झाल्याचे प्रसंगी पहावयास मिळाले यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्या युतीने या महाविकास आघाडीस सुरूंग लावला म्हटले तर योग्य. तशी चर्चा निकालानंतर आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि महायुती यांच्यात थेट निवडणूक झाली असती तर त्याचे परिणाम वेगळे दिसले असते. जर तर चा भाग वेगळा मात्र या निवडणुकीत अपक्षांनी घेतलेली झेप नक्कीच दोन्ही प्रस्थापित पक्षांना मात देणारे ठरू शकते. कारण, एवढे अपक्ष उमेदवार निवडून येतील याची शाश्वती नसतानाही तब्बल सहा अपक्षांनी या निवडणुकीत बाजी मारली. यातील प्रभाग आठ मधील महेंद्र रोडे यांच्या सुविद्य पत्नी अर्चना रोडे यांनी विजय पटकावून भिमकन्या म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. कारण, प्रस्थापित पक्षाचे आणि साम दाम दंड भेद अशा प्रकारचे उमेदवार या निवडणुकीत उभे असताना एका भिमकन्याने अपक्षातून मिळविलेला विजय निश्चितच आंबेडकरी विचारांच्या नेत्यांना ,कार्यकर्त्यांना विचार करायला लावणारा आहे. यापूर्वी सुद्धा परळी नगरपरिषदेचे नगरसेवक व सभापती म्हणून काम केले आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्याचा सहभाग असतो.मतदार राजांनी दिलेली ही त्याची पोचपावती म्हणता येईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार केला आणि मोठ्या हिमतीने व चुरशीने लढून त्यांनी विजय संपादन केला आहे याबद्दल त्यांचे आंबेडकरी अनुयायांकडून विशेष कौतुक होत असून, शहरामध्ये अर्चना रोडे व महेंद्र रोडे यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने तिकीट नाकारल्यामुळे त्यांची अवस्था घायल असल्यासारखी झाले होते मात्र त्यांनी ही निवडणूक अपक्ष जिंकून घातक असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे ते या विजयाने धुरंधर म्हणून चर्चा होत आहे.परळी सारख्या शहरात एका आंबेडकरवादी विचारांचा नेता अपक्ष निवडून येण वाटतं तितकं नक्कीच सोपं नाही.याची प्रचिती महाराष्ट्राला माहीत आहे. परळीतील कोणतीही निवडणूक असो, त्याची चर्चा राज्यभर होते.अशा परळीत अपक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते महेंद्र रोडे यांच्या पत्नी अर्चना रोडे निवडून येण म्हणजे हा आंबेडकरी विचारांचा विजय आहे.कुठल्याही पक्षाचे आणि संघटनाचे पाठबळ नसताना हा विजय केवळ जनतेच्या बळावर खेचून आणला आहे भीम रणरागिणीने अर्चना रोडे यांनी. 
कष्ट आणि सचोटी व केलेल्या कामाशी प्रामाणिक राहून त्यांनी सवंगड्यांना सोबत घेऊन, प्रस्थापित पक्षांना मात देत आंबेडकरवादी विचारांचा प्रभाव दाखवून दिला.आंबेडकरी विचारांचा विजय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेले न्यायपूर्ण, समताधिष्ठित आणि मानवी मूल्यांवर आधारित समाजाचे स्वप्न प्रत्यक्षात आणणे होय. हा विजय म्हणजे अस्मिता आणि आत्मसन्मान निर्माण करणारा आहे.या विजयाने त्यांची चर्चा शहरात धुरंधर म्हणून होत आहे.