Home गुन्हेगारी अवैध चाकू वापरणारा पोलिसांच्या ताब्यात  -परभणी शहरातील ग्रँड कॉर्नर परिसरातील घटना

अवैध चाकू वापरणारा पोलिसांच्या ताब्यात  -परभणी शहरातील ग्रँड कॉर्नर परिसरातील घटना

अवैध चाकू वापरणारा पोलिसांच्या ताब्यात      -परभणी शहरातील ग्रँड कॉर्नर परिसरातील घटना

 

परभणी(प्रतिनिधी)शहरातील एपना कॉर्नर ते ग्रँड कॉर्नर दरम्यान एक युवक कमरेला चाकू बाळगून फिरत असताना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना सोमवारी(दि. १२)रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

संतोष विठ्ठल घोडके(वय २४) रा. सिरसम बुद्रुक ता. जि. हिंगोली असे आरोपी युवकाचे नाव आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नानलपेठ पोलिसांचे पोलिस उपनिरीक्षक बिक्कड, पोलिस हवालदार बिक्कड, पोलिस अंमलदार शेख अल्ताफ, असिफ शेख असे शहरात गस्त घालत असताना अपना कॉर्नर ते ग्रँड कॉर्नर दरम्यान एक युवक कमरेला चाकू बाळगून फिरत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास एक युवक कमरेला चाकू बाळगून फिरत असताना मिळून आला. त्यास तातडीने ताब्यात घेऊन पंचासमक्ष घडती घेतली असता त्याच्याकडे धारदार चाकू मिळून आला.

या प्रकरणी पोलिस अंमलदार निलेश कांबळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी युवकाविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कायद्याच्या विविध कलमान्वये नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here